Election Counting : स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही डिस्प्लेमध्ये बिघाड; निवडणूक विभागाची धावपळ

Technical snag in CCTV display in front of strong room : ‘डाटा स्टोरेज फुल’मुळे लाईव्ह फीड बंद; प्रशासनाकडून तातडीची दुरुस्ती, पारदर्शकतेवर लक्ष

Buldhana निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही डिस्प्लेमध्ये मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. अचानक लाईव्ह फीड बंद झाल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले; मात्र निवडणूक विभागाने तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्ट्राँग रूमसमोर सुरू असलेल्या ‘पहारा आंदोलनात’ सहभागी असलेले उमेदवार प्रतिनिधी अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली व सखोल चौकशीची मागणी केली. ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच प्रशासन हालचालींना वेग आला.

Vidarbha Farmers : थकीत पीकविम्यासाठी तहसीलसमोर ‘बर्तन बजाव’ आंदोलन

स्ट्राँग रूमसमोरील ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लाईव्ह चित्रण दाखवणाऱ्या डिस्प्लेमध्ये ‘डाटा स्टोरेज फुल’ असा संदेश दिसत होता, परिणामी लाईव्ह फीड बंद झाला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संगणक तंत्रज्ञ व सीसीटीव्ही कंत्राटदारांना तातडीने पाचारण करण्यात आले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री काटकर यांच्या उपस्थितीत संबंधित डिस्प्ले टीव्ही तत्काळ बदलण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्हीचे लाईव्ह चित्रण पूर्ववत सुरू झाले. संगणक तंत्रज्ञ विशाल हिवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्प्लेचे डाटा स्टोरेज पूर्ण झाल्याने तसेच टीव्हीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही अडचण उद्भवली होती.

Vanchit Bahujan Aghadi : निवडणूक जाहीर होताच, वंचितने कार्यकारीणी बदलली!

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतीही शंका राहू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात असून, घटनेची तांत्रिक पातळीवर तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.