Election Update : राज्यातील तीन ठिकाणी नगर निवडणुकीला ब्रेक

Stirring up excitement and discussions in political circles : राजकीय वर्तुळात खळबळ आणि चर्चांना उधाण

Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या नगर प्रभागातील निवडणुकीला तात्काळ स्थगिती दिली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाशी संबंधित निकालाचा तणावपूर्ण क्षण निर्माण असतानाच ही घटना घडल्याने राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. उमेदवारांच्या निधनामुळे ही स्थगिती लागू करण्यात आली असून या निर्णयाचा प्रभाव त्यांनी ज्या प्रभागातून उमेदवारी दाखल केली होती त्या प्रभागापुरताच राहणार आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला मात्र कोणतीही स्थगिती नसून ती नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल लागू शकणार आहेत. उमेदवारांना चिन्ह वाटप पूर्ण झालेले असून प्रचारही अंतिम टप्प्यात आहे. अशात तीन ठिकाणी अचानक निवडणूक स्थगिती आल्याने संबंधित प्रभागातील कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी ही स्थिति अनपेक्षित असल्याचे सांगितले तर काहींकडून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून प्रतिक्रिया देण्याची भूमिका व्यक्त केली जात आहे.

Mirza Rafi Baig : ‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग काळाच्या पडद्याआड

उत्तर महाराष्ट्रात दोन ठिकाणी आणि मराठवाड्यात एका ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार नितीन वाघमारे यांच्या निधनामुळे निवडणुकीला गणिती देण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्या प्रभागातील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 मधील दूरदानाबेगम सलीम फारुकी यांचे निधन झाल्यामुळे येथेही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. या तिन्ही प्रभागातील निवडणुका पुढे कधी घेतल्या जाणार याचा निर्णय पुढील काही दिवसांत आयोगाकडून जाहीर केला जाण्याची अपेक्षा आहे.

Chandrashekhar Bawankule : जेवढे नगरसेवक निवडून येतील, त्यांची मते प्रवीण पोटे यांच्यासाठी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जोर वाढत असताना आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या तिन्ही ठिकाणच्या मतदान प्रक्रियेला अचानक ब्रेक लागल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समर्थकांमध्ये संभ्रम असून कार्यकर्त्यांना नवीन निवडणूक वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर उर्वरित सर्व प्रभागांतील निवडणुकीसंदर्भातील तयारी नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

____