Electricity bill Overdue : वीज वितरण कंपनीची ग्रामपंचायतींना नोटीस!

 

The electricity distribution company issued a notice to the gram panchayats : दोन हजार कोटींच्या वसुलीसाठी कारवाई; शेकडो गावांतील पाणीपुरवठा अडचणीत

Yavatmal गावातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यापासून ग्रामंपचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरलेच नाही. यातून थकबाकीचा आकडा दोन हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. मूळ देयक आणि त्यावरचे व्याज मिळून हा आकडा तयार झाला आहे. आता वीज कंपनीने वसुलीसाठी जिल्ह्यातील दोन हजार गावांतील ग्रामपंचायतीला नोटीस बजावल्या आहेत.

ऐन उन्हाळ्यात वीज कापली गेल्यास पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची स्थिती आहे. गावातील पाणीपुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर अवलंबून आहे. ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी अनेक ठिकाणी तात्पुरते आहेत. यामुळे पाणीपुरवठा कराची वसुली होत नाही. वसुली न झाल्याने पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाची थकबाकी झाली आहे. ग्रामपंचायतीला पैसा नसल्याने वीजबिल भरणे शक्य होत नाही.

Mahavitaran : दोन वर्षांपासून शेतकऱ्याच्या येरझारा; तरीही वीज जोडणी नाही!

गतवर्षी राज्य शासनाने पाणी बिलाचा भरणा करण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला होता. यातून ठराविक कालावधीचे बिल ग्रामपंचायतीला भरता आले. मात्र, जुने वीजबिल आणि चालू वर्षातील बिल थकले आहे. यावर्षी व्याज वाढले आहे. यातून वीज वितरण कंपनीचे बिल पुन्हा ‘जैसे थे’ थकीत झाले आहे.

Wardha Mahavitaran : ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना मिळणार स्मार्ट फोन !

यावर्षी १५ व्या वित्त आयोगातून वीज बिलाचा भरणा करण्यासाठी तरतूद होईल, अशी अपेक्षा ग्रामपंचायतींना होती. प्रत्यक्षात मार्च महिना संपूनही वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही. यामुळे वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. दुसरीकडे पाणी कराची वसुली थांबली आहे. उन्हाळ्यात करवसुलीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाला कठोर भूमिका घेता येत नाही. ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी आणि करवसुली यातूनच निधी उपलब्ध होतो.

याशिवाय दुसरे आर्थिक स्त्रोत केवळ बोटावर मोजण्याइतक्या ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहेत. पैसा नसल्याने वीजबिल भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यातून ही रक्कम दोन हजार कोटींच्या घरात गेली आहे