Breaking

Employment Guarantee Scheme (EGS) Committee : विधिमंडळाच्या रोहयो समितीचा दौरा, प्रशासनात खळबळ

The administration has started working due to the committee’s visit : २५ आमदारांची समिती करणार पाहणी, यंत्रणा लागली कामाला

Amravati राज्य विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना (रोहयो) समितीचा अमरावती जिल्ह्याचा संभाव्य दौरा लवकरच होणार असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. २५ आमदारांची ही समिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) आणि राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करणार असून, सचिवालयाने संबंधित विभागांना २०१९-२० ते मे २०२५ या कालावधीतील सविस्तर माहिती मागविली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेपासून ते रोजगार हमी विभागातील प्रशासन यंत्रणा माहिती संकलनाच्या कामात व्यग्र झाली आहे. सचिवालयाकडून पाठविण्यात आलेल्या प्रश्नावलीत कामांची यादी, अंदाजपत्रक, प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचे तपशील, काम सुरू व पूर्ण होण्याचा कालावधी, खर्चाची रक्कम, आणि सद्यस्थिती आदी सूक्ष्म माहिती मागविण्यात आली आहे.

MLA Nitin Deshmukh : झुंडशाहीला प्रत्युत्तर देणारच; दबावाला बळी पडणार नाही

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘ऑन दी स्पॉट’ पाहणी

समितीच्या दौऱ्यात सदस्य ‘ऑन दी स्पॉट’ भेटी देऊन विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्याचबरोबर योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, त्रुटी आणि यंत्रणांचे कार्य यावरही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे या दौऱ्याची तयारी करताना प्रशासनाकडून सखोल माहितीची तयारी सुरू आहे.

Fraud Teachers appointment : बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा सूत्रधार शिक्षण मंडळाचा अध्यक्ष?

फक्त काही दिवसांत माहिती सादर करण्याचे आव्हान

सचिवालयाने २ जून रोजी पाठविलेल्या पत्रानुसार, हा संपूर्ण डेटा अल्प कालावधीत सादर करणे अपेक्षित असल्याने यंत्रणांवर ताण वाढला आहे. मागील पाच वर्षांतील तालुकानिहाय कामे, त्यावर झालेला खर्च, मंजुरीच्या तारखा व सद्यस्थिती अशी माहिती संकलन करणे ही मोठी कसरत ठरत आहे.