Big blow to Congress Shiv Sena in Vidarbha : विदर्भात काँग्रेस-शिवसेनेला मोठा धक्का
Mumbai ; राज्यात भाजपकडून जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यामुळे विदर्भात काँग्रेससोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे गटातील 10 नगरसेवकांनीदेखील भाजपात प्रवेश केला.
अनिल धानोरकर हे भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेसकडून विधानसभा तिकीट न मिळाल्याने नाराजी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर वरोरा मतदारसंघातून निवडणूक लढवली. धानोरकर कुटुंबीयांचा भद्रावती नगरपरिषदेवर दीर्घकाळ वर्चस्व होते,
पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले धानोरकर कुटुंबाने स्थानिक राजकारणात मोठं योगदान दिलं आहे. अनिल धानोरकर आमच्यासोबत आलेत, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भाजप हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात कुणालाही वेगळं पडू देणार नाही. भाजप नेते गणेश नाईक यांनीही पुढील निवडणुकांमध्ये भाजपचं वर्चस्व राहील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि पालघर जिल्हा परिषद आमच्याकडे राहील. मित्रपक्षांचा सन्मान राखून भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनेल.”
BALASAHEB THORAT : थोरांतांच्या धमकीचा निषेध करण्यासाठी हजारो एकवटले
अनिल धानोरकरांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचाही भाजपकडे कल वाढल्याने महाविकास आघाडीतील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
____








