Sudhir Mungantiwar : चर्चा नव्हे कृती ! कापडी पिशव्या वाटून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

Mungantiwar’s environmental awareness from the vegetable market : भाजी बाजारातून मुनगंटीवारांची अशीही पर्यावरण जागृती !

Chandrapur Durgapur News : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार धडाकेबाज निर्णय आणि कामांसाठी ओळखले जातात. तसेच कुठलाही बडेजाव न करता ते साधेपणामुळेही लोकप्रिय आहेत. सामान्य लोकांमध्ये मिसळणे हा त्यांचा स्वभाव आहे. याचा प्रत्यय काल दुर्गापूरच्या भाजी बाजारामध्ये आला.

दुर्गापूरच्या भाजीबाजारात रविवारी लोकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कारण आमदार सुधीर मुनगंटीवार थेट भाजी बाजारात पोहोचले होते. झाले असे की, दुर्गापूर ग्रामपंचायत परिसरात गोवारी समाजाने रविवारी (१९ जानेवारी) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी ते जात होते. वाटेत त्यांना भाजी बाजार दिसला. त्याचवेळी भाजी घेण्याची त्यांची ईच्छा झाली. पण कार्यक्रमाला उशीर होईल म्हणून त्यांनी त्यावेळी आपल्या ईच्छेला ब्रेक दिला. पण परतीच्या वेळी ते आवर्जून भाजीबाजारात थांबले. यावेळी त्यांनी भाजीपाला खरेदी केला. काही दुकानदारांनी त्यांना प्लास्टीकच्या पिशवीतून भाजी दिली. तेव्हा प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी बाजारातील दुकानदारांना दिला. नुसता सल्लाच दिला नाही, तर भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्याही दिल्या.

Sudhir Mungantiwar : पर्यावरणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता !

आमदार मुनगंटीवार यावेळी पूर्ण बाजार फिरले. त्यांच्या आवडीच्या पालेभाज्या, तुरीच्या शेंगा, गोबी, कंद, गाजर, मुळे आदी विकत घेतले. बाजारहाट करताना लोक त्यांच्याजवळ येऊन आस्थेने बोलत होते. आमदार महोदयसुद्धा स्मितहास्य करत सर्वांचे अभिवादन स्वीकारत होते. नमस्काराला नमस्काराने उत्तर देत लोकांशी बोलत होते, चर्चा करत होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद अनेकांनी अनुभवला.

आमदार मुनगंटीवार यांनी नुकतीच चंद्रपूरमध्ये दीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज २०२५’ आयोजित केली होती. पर्यावरणातील बदलांमुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा उहापोह या परिषदेमध्ये करण्यात आला. देश-विदेशातील नामवंत तज्ज्ञांनी या कॉन्फरन्समध्ये पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी उपाय सुचवले. त्यासंदर्भात नवी दिशा दिली. मुनगंटीवार यांनी अगदी भाजी बाजारातदेखील पर्यावरणाप्रती आपण किती जागरूक आहोत, हे दाखवून दिले. प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर करू नका, असा सल्ला देत भाजी विक्रेत्यांना त्यांनी कापडी पिशव्या दिल्या.

Nitin Gadkari : विदर्भाला संत्रा प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता

मंत्री असताना व्यस्ततेमुळे कमी झालेला जनसंपर्क आता मुनगंटीवार यांनी पुन्हा वाढवला आहे. प्रत्यक्ष बाजारात मुनगंटीवार यांची भेट घेत.लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद व्यक्त केला. रविवारी बाजारहाट करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत रामपाल सिंग, संजय यादव यांच्यासह त्यांचे इतर सहकारी, कार्यकर्ते होते.