Sanjay Raut’s attack before Dussehra gathering : दसरा मेळाव्यापूर्वी संजय राऊतांचा घणाघात
Mumbai: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय तापमान चांगलेच तापत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना गुढीपाडवा, अक्षय तृतीया किंवा दसरा असे मुहूर्त पाहून केली नव्हती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होईल, तोच साडेचारवा मुहूर्त असेल.”
ते म्हणाले की, “दसऱ्याला दोनच मेळावे महत्त्वाचे आहेत. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि दुसरा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. बाकी कोणी आपल्या कार्यक्रमाला दसरा मेळावा म्हणत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देशभराचं लक्ष या दोन मेळाव्यांवर असतं.”
शिंदे गटावर टीका करताना राऊत म्हणाले की, “प्रचंड पैशांचा वापर करून लोक आणले जातील. पण तुम्ही कोण? तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? महाराष्ट्राला काय विचार दिला? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तुम्ही कुठे होता? जर वाटत असेल की, तुम्ही शिवसेना स्थापन केली, तर जन्माचा दाखला आणा.”
भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, “दिल्लीला एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे, तिथे त्यांनी राजकारणातील चोरीचा माल विकायला ठेवला आहे. त्याला जनता शिवसेना मानत नाही. एक निवडणूक आयोग आणि भाजप सोडले तर बाकी कोणी त्यांना शिवसेना मानत नाही.”
एकनाथ शिंदेंवर वैयक्तिक टीका करताना राऊतांनी म्हटलं की, “एकनाथ शिंदेंचा पक्ष ही नरेंद्र मोदींची उपकंपनी, बेनामी कंपनी आहे. मी त्यांना पक्ष मानत नाही. पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यानंतर नष्ट होतात, तसेच हे गांडूळ मोदी-शाह असल्यापर्यंत टिकतील. पण त्यानंतर संपून जातील.”
Philippine Earthquake : फिलीपाईन्सला 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा
राऊतांनी ठामपणे सांगितलं की, “बाळासाहेब सामान्यांचे पुढारी होते. त्यांनी कधीच दिल्लीच्या चरणी आपला पक्ष अर्पण केला नाही. उलट स्वतःचे निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी घेतले. पण शिंदे गट ही दिल्लीच्या चरणी थैल्या अर्पण करणारी बेनामी व्यवस्था आहे.”








