‘Letter war’ between two ministers of the Social Justice Department : सामाजिक न्याय विभागाच्या दोन्ही मंत्र्यांमध्ये ‘लेटर वॉर’
Mumbai : महायुती सरकारमध्ये आता मंत्री विरुद्ध राज्यमंत्री असा थेट संघर्ष उभा राहिलेला दिसतोय. भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना थेट आणि जाहीर उत्तर दिलं आहे. ‘ मला बैठका घेण्याचा अधिकार आहे, आणि मी पुढेही घेणार!’ असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला आहे.
मिसाळ यांनी संजय शिरसाट यांना विचारात न घेता विभागाची बैठक घेतली, आणि त्यावरून शिरसाट भडकले. त्यांनी मिसाळ यांना अप्रत्यक्ष इशारा देत पत्र लिहिलं. पण मिसाळांनीही उत्तर देताना फार थेट आणि कडक शब्दात उत्तर दिलं. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाच पत्र पाठवून शिरसाटांच्या पत्राची प्रत जोडली आणि स्पष्ट लिहिलं
राज्यमंत्री या नात्याने मला विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या अखत्यारीतील कोणताही निर्णय मी घेतलेला नाही. आणि यापुढेही अशा बैठका घेणार आहे!
Sanjay Raut : शिंदे पिता-पुत्रांनी हजारो कोटीं लूटले ! फडणवीस सरकार ‘कॅरेक्टरलेस’
फडणवीसांनी जाहीर केलेल्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाचा हवाला देत त्यांनी म्हटलं, मुख्यमंत्री कार्यालयानेच मला बैठका घेण्याचे आदेश दिले आहेत, मग परवानगी कशाची आणि कुणाची? यानंतर सगळ्यांच्या नजरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खिळल्या आहेत. आता या दोन मंत्र्यांतला संघर्ष ते कसा सोडवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Dharmapal Meshram : वंचितांना न्याय देणे ही आयोगाची प्रमुख भूमिका !
महायुती सरकारमध्ये खालच्या पातळीवर समन्वयाचा अभाव असल्याचे या प्रकाराने समोर आले आहे. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री एकाच विभागात, पण ते जाहीर पत्राच्या माध्यमातून एकमेकांच्या वर्चस्वावर भाष्य करत आहेत. असा प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. शिरसाट यांचं ‘ मर्यादा ओलांडू नका’ हे सूचक वाक्य, आणि माधुरी मिसाळ यांचं ‘ मी थांबणार नाही’ हे थेट उत्तर, हे दोघांच्या संघर्ष समोर आलं आहे. दरम्यान शिरसाठ यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमच्यात कोणता वाद नाही आणि प्रश्न मिटला आहे असे स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.








