Allegation of malpractice against a Gram Panchayat official : ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गैरव्यवहाराचा आरोप; कारवाईची मागणी
Sakharkherda शिंदी ग्रामपंचायतीतील एफ-क्लास सरकारी जमीन बेकायदेशीरपणे खाजगी व्यक्तीच्या नावे करून देत तसेच संबंधित व्यक्तीस घरकुलाचा लाभ मिळवून देत तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गंभीर गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर शिस्तभंगात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गणेश तुकाराम खरात यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य खरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनकर काळे हे मार्च २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शिंदी येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात मालमत्ता क्रमांक ८६६ ही शासनाच्या मालकीची, एफ-क्लास म्हणून नोंद असलेली जमीन असूनही, तिचा नमुना ८अ बेकायदेशीरपणे अंबादास रामराम वायाळ यांच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे.
Terror of wild animals : सारोळापीर शिवारात मृत बिबट्या आढळल्याने खळबळ
तक्रारीत नमूद केलेले गंभीर मुद्दे
कर आकारणी रजिस्टरमध्ये एका मालमत्तेला दोन मालमत्ता क्रमांक देण्यात आल्याचा आरोप आहे. मालमत्ता नोंदणी अनुक्रमणिकेत खोडतोड, नोंदीची अधिकृत प्रमाणित पाहणी उपलब्ध नसणे, जमीन एफ-क्लास असूनही मालकीचा पुरावा न घेता नमुना ८ तयार करणे, नमुना ८ तयार करताना कोणताही ठराव, दाखला किंवा शासनानुमोदन नसणे, यामुळे ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन खाजगी व्यक्तीच्या नावे झाल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे आहे.
Teacher’s Constituency : जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र; दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत
याशिवाय, मालमत्ता क्रमांक ८६६ वर घरकुल मंजूर करून देण्यात आले असून पहिल्या हप्त्याद्वारे १५ हजार रुपये लाभार्थ्याला वितरितही झाले आहेत. मात्र, घरकुल देताना जमीन लाभार्थ्याच्या स्वतःच्या मालकीची असल्याचा नियम असून, एफ-क्लास जमीन कोणत्याही प्रस्तावाविना खाजगी दाखवली गेल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य खरात यांनी म्हटले आहे की, “सरकारी पदावर असताना ही गंभीर कसूर असून, शिस्तसेवा अधिनियमानुसार दिनकर काळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.”








