Outrage against the government over the decision to force FRS : तांत्रिक अडचणींचा बळी गरीब; सरकारवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप
Buldhana अंगणवाडी डिजिटलायझेशनच्या नावाखाली फेस रिकग्निशन सिस्टीम (FRS) ची सक्ती करून सरकार लाखो गरजू लाभार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे. यावर २१ ऑगस्ट रोजी राज्यभर काळी साडी किंवा काळी फित लावून आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी सांगितले की, “ही प्रणाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयकाचे उघड उल्लंघन आहे. आधार आणि FRS नोंदणीच्या नावाखाली लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवले जात आहे.” त्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल हे ३जी, कमी क्षमतेचे व हलक्या दर्जाचे आहेत. ग्रामीण भागात नेटवर्क रेंज नसल्याने OTP येत नाही, अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःचे मोबाईलही नाहीत. फेस रेकग्निशन तांत्रिक कारणांमुळे फेल होते, त्यामुळे नोंदणी पूर्ण होत नाही.
Pawars warning : पक्षाच्या नावावर दुकानदारी केली तर त्याचा बंदोबस्त करणार,
“सरकारने आधारशिवाय लाभार्थ्यांना आहार द्यावा; FRSची सक्ती तातडीने थांबवावी,” अशी संघटनेची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्यात सीटूच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे, कोषाध्यक्ष सरलाताई मिश्रा, उपाध्यक्ष मंदा डोंगरदिवे, बेबी दाते, माया वाघ, वनमाला वानखेडे, मिना नागरे, सुजाता गवई, निशा घोडे, अपेक्षा शिंगणे, अनिता खडसे, वर्षा शिंगणे, संगिता मादनकर, उषा जैवळ, शारदा इंगळे, पुष्पलता खरात यांसह अनेक सेविका सहभागी झाल्या.
Farmers morcha : माझ्या नादाला लागला तर ‘तिथं’ नांगराचा फाळ घालीन
FRS सक्तीच्या निर्णयावरून सरकारवर अन्यायाचा ठपका ठेवला जात असून, ही लढाई आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. “डिजिटलायझेशनच्या नावाखाली उपासमार स्वीकारणार नाही,” असा इशारा संघटनेने दिला आहे.