Fake birth certificate case : जन्म दाखल्यातील बनावट प्रकरण; 41 आरोपींवर चार्जशीट, 1300 पानांचे आरोपपत्र

Chargesheet filed against 41 accused, 1,300-page charge document : एसआयटीचा तपास पूर्ण, न्यायालयात आरोपपत्र दाखल

Amravati बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले मिळविण्याच्या गाडगेनगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. तब्बल सात महिन्यांच्या चौकशीनंतर सोमवारी १३०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून यात ४१ आरोपींना आरोपी करण्यात आले आहे.

सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) ही चौकशी केली. मूळ गुन्ह्यात सहा आरोपींचा समावेश होता, मात्र तपासादरम्यान आरोपींची संख्या लक्षणीयरीत्या वाढली.

Harshvardhan Sapkal : कृषीमंत्री बेपत्ता आहेत, आपण त्यांना पाहिले का?

१८ फेब्रुवारी रोजी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. शाळा सोडल्याच्या दाखल्यांमध्ये खोडतोड करून आणि बनावट कागदपत्रे जोडून जन्म दाखले मिळविण्याचे प्रकार उघडकीस आले होते. यानंतर शहर पोलिस आयुक्तालयाने ‘स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम’ (एसआयटी) गठित केली होती.

एसआयटीने गाडगेनगर पोलिस ठाण्यातील नोंद प्रकरणासह एकूण ५४ संशयित प्रकरणांची तपासणी केली. पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार, अतुल वर आणि समाधान वाठोरे यांनी सूक्ष्म तपासणी करून अल्पावधीत दोषारोपपत्र तयार केले.

local body elections : काँग्रेसने नेमले प्रभागनिहाय निरीक्षक, अनेकांचा प्रवेश

अशी होती मूळ तक्रार

१८ फेब्रुवारी रोजी दाखल एफआयआरमध्ये खालील सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता :
आरिफ रहमान खान (रा. चपराशीपुरा)
रहीम खान नियामत खान (रा. बडनेरा)
सैय्यद युसूफ अली सैय्यद कादर (रा. मोमीनपुरा, बडनेरा)
मोहम्मद निझामुद्दीन मोहम्मद हनीफ मुल्ला (रा. बडनेरा)
जमील खान कालम खान (रा. नमुना, अमरावती) तसेच एक महिला