Fake currency case : मालेगाव बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत

Shivsena (Shinde group) taluka chief in trouble due to call recordings : शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाची चौकशी, ‘कॉल रेकॉर्ड’मुळे अडचणीत

Akola नाशिकच्या मालेगावमध्ये ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आलेल्या १० लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे आता अकोला जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांना ताब्यात घेऊन सुमारे दोन तास कसून चौकशी केली. या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गत नोव्हेंबर महिन्यात नाशिक पोलिसांनी मुंबई–आग्रा महामार्गावर सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. मध्य प्रदेशातील नाझिर अक्रम मोहम्मद अयुब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी यांच्याकडून ५०० रुपयांच्या तब्बल १० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या आरोपींच्या चौकशीतून बनावट नोटांचे रॅकेट आंतरराज्यीय स्वरूपाचे असल्याचे निष्पन्न झाले होते.

Local Body Elections : निकालापूर्वीच पराभव झाल्याचा आला मेसेज

प्रकरणाच्या सखोल तपासादरम्यान अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका युवकाचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी या संशयित युवकाच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता, त्यामध्ये मूर्तिजापूर येथील शिवसेना तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांच्याशी संपर्क झाल्याची नोंद आढळून आली. या तांत्रिक पुराव्याच्या आधारे नाशिक एलसीबीच्या पथकाने रविवारी मूर्तिजापूर येथे धडक देत दांदळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

नाशिक पोलिसांनी दांदळे यांची सुमारे दोन तास चौकशी केली. या चौकशीत बनावट नोटा प्रकरणातील संशयित आरोपींशी त्यांचे नेमके संबंध काय आहेत, याबाबत माहिती घेण्यात आली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी दांदळे यांना नोटीस बजावून तपासासाठी वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याचे नाव बनावट नोटांसारख्या गंभीर गुन्ह्याशी जोडले गेल्याने जिल्ह्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Local Body Elections : नगराध्यक्ष एका पक्षाचा, बहुमत दुसऱ्यालाच

दरम्यान, या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १७९, १८० आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नाशिकचे अपर पोलीस अधीक्षक संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर आणि पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.