Ajit Pawar hints at taking decision at right time : स्पष्ट संकेत दिले, जाहीरनाम्याचाही केला उल्लेख
Pune : राज्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असून मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे त्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत संकेत दिले.
“आता लाडकी बहिण आणि वीज माफीवर काम सुरू आहे. कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात आहे. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ,” असे अजित पवार म्हणाले. पत्रकारांनी ‘योग्य वेळ कधी येणार?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी, “योग्य वेळ आल्यावर आम्ही सांगू,” असे उत्तर दिले. राज्यकारभार करताना सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतले जातात, असेही ते म्हणाले.
आज त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत गणेशोत्सवाबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून राज्यातील संपूर्ण यंत्रणा उत्सव यशस्वी करण्यासाठी झोकून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. “सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील, तर शेवटच्या दिवशी दिवसभर सुरू राहील,” असे ते म्हणाले. तसेच मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीसाठी योग्य नियोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Women Commission : महायुती सरकार देवासारखं, महिला आयोग परिषदेत वक्तव्य
पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, “काही गावांमध्ये 1285 एकर जमीन भूसंपादनासाठी घेण्यात येणार आहे. काहींचा विरोध असला तरी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढू. ज्या घरांवर परिणाम होईल त्यांना योग्य मोबदला दिला जाईल.”
NCP Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीने राजकीय चर्चांना उधाण !
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रात काही धरणे भरलेली आहेत. माणिक डोहमध्ये पाणी कमी असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. “रेड अलर्ट धोका टळला असून शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.