Farmer movement : मराठा आंदोलना सोबत आणखी एक लढा पेटणार

Bachchu Kadus farmer rights march begins : बच्चू कडूंची शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा सुरू

Mumbai : एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून सरकारवर प्रचंड दबाव आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात आणखी एका मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. प्रहारचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकरी व शेतमजुरांच्या हक्कांसाठी राज्यव्यापी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सरकारची दुहेरी कोंडी होण्याची शक्यता आहे.

आजपासून वाशिम जिल्ह्यातून बच्चू कडू यांच्या “शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा” ला सुरुवात होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू दररोज ५ ते ६ सभा घेणार आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हा त्यांचा मुख्य मुद्दा असून, या मागणीवर ते ठाम आहेत.

Amit Shah : मराठा आंदोलनावर अमित शाहांचा आढावा

बच्चू कडू यांनी पूर्वी 2 ऑक्टोबरला शेतकरी कर्जमाफीसाठी मुंबईत मोठं आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आता हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून 28 ऑक्टोबरला मुंबईत भव्य मोर्चा काढला जाणार आहे. राज्यातील सर्व संघटनांना या आंदोलनासाठी सोबत घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
एका बाजूला मराठा समाज आरक्षणासाठी आझाद मैदानावर ठामपणे उभा आहे, तर दुसरीकडे बच्चू कडूंची शेतकरी हक्क यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारसमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे. मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफी या दोन संवेदनशील प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास राज्यातील राजकीय वातावरण अधिक पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

Uddhav Vs. Shinde Shiv Sena : बुलढाणा मतदार संघातील चुरशीची निवडणूक न्यायालयात

“शेतकऱ्यांसाठी लढलो तर मत मिळत नाहीत, आंदोलनात शेतकरी येत नाहीत, असं आम्हाला एका मोठ्या नेत्याने म्हटलं होतं. पण आम्हाला शेतकऱ्यावर विश्वास आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आमच्या सोबत येतील” अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे. आता संपूर्ण राज्याचं लक्ष एकीकडे आझाद मैदानावरील मराठा आंदोलनावर, तर दुसरीकडे वाशिमहून सुरू झालेल्या शेतकरी हक्क यात्रेकडे लागलं आहे.

____