Farmer Suicide : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या!

Most farmer suicides in Western Vidarbha : चोवीस वर्षांत २१,१२० शेतकऱ्यांनी संपवले जीवन; मराठवाड्यात १२,५१२ बळी

Amravati राज्यात गेल्या २४ वर्षांत ४९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये पश्चिम विदर्भात सर्वाधिक २१,१२०, तर मराठवाड्यात १२,५१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी कृषी विभागाच्या ३५ योजना अस्तित्वात आहेत. तरीही ‘डीबीटी’च्या लॉटरी पद्धतीमुळे गरजू शेतकऱ्यांना हमखास लाभ मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे बळीराजाच्या संघर्षावर नैराश्याचे सावट गडद होत आहे.

राज्यातील पश्चिम विदर्भातील ५, पूर्व विदर्भातील १ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. २०२३ मध्ये अमरावती विभागात १,०५१, वर्धा जिल्ह्यात १०४, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी ९८१ प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र, ४१४ अपात्र, तर ७११ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

Farmer suicide case : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने संतापाचा उद्रेक

राज्यात दररोज सात ते आठ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे भीषण वास्तव आहे. शेतकरी आत्महत्यांमागे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान, नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्जवसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, गंभीर आजार यांसह विविध आर्थिक आणि सामाजिक कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२३ जानेवारी २००६ च्या शासन आदेशानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत देण्यात येते. ३० हजार रुपये थेट धनादेशाद्वारे, तर ७० हजार रुपये पोस्ट/बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेत जमा करण्यात येतात. १९ वर्षांपासून या मदतीच्या रकमेतील वाढ करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, गेल्या दशकभरात या मिशनचीच दिशा भरकटली असून, शासनाला कोणत्याही प्रभावी शिफारशी करण्यात आलेल्या नाहीत.

Ramdas Athavle : आठवलेंच्या सभेने आरपीआय फुंकणार रणशिंग!

शेतकरी आत्महत्या : २००१ ते २०२४

अमरावती विभाग – अमरावती : ५,४०४, अकोला : ३,१४१, यवतमाळ : ६,२३०, बुलढाणा : ४,४५३, वाशिम : २,०५८
नागपूर विभाग – वर्धा : २,४६४
छत्रपती संभाजी नगर विभाग : छत्रपती संभाजी नगर १,६८१, जालना : १,०७९, परभणी : १,२५१, हिंगोली : ५७६, नांदेड : २,०१२, बीड : ३,१७०, लातूर : ९८५, धाराशिव : १,७३८