Farmers in crisis : धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका; आम्ही सोबत आहोत

Uddhav Thackerays appeal to flood-affected farmers : उद्धव ठाकरेंचं पूरग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन

Latur : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लातूरच्या काटगाव येथे पोहोचले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आणि थेट शेतकऱ्यांना धीर दिला. “आस्मानी संकटामुळे कुणीही खचून जाऊ नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका. सरकारकडून जेवढी तातडीची मदत हवी आहे, ती आम्ही मिळवून देऊ. हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यासाठी आम्हीही आग्रही राहू,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. त्यांनी सांगितलं, “शेतकरी संकटात सापडला आहे. आम्ही सरकारवर दबाव आणून त्यांना न्याय मिळवून देऊ. तातडीची मदत मिळालीच पाहिजे, त्यानंतर इतर गोष्टीसाठीही आम्ही लढू. शेतकऱ्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही, कारण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.”

Heavy rains cause damage : विजय वडेट्टीवारांच्या आवाहनाला चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद !

आजच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे लातूरनंतर धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना भेट देणार आहेत. मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून अनेकांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे.

Appreciation of CM : देवाभाऊ भावनिक, विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता !

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूर दौऱ्यात २,२१५ कोटींच्या मदतीची घोषणा केली असून प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना आणखी मदत देण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि “जमीन खरडून गेलेली असो वा पिकांचं नुकसान झालं असो, सरकार मदत करणारच,” असं शेतकऱ्यांना आश्वस्त केलं.

____