Farmers’ loan waiver : नेते नाहीत ‘साऊथचे सुपरहिरो, शेतकरी जागा झाला तरच सत्ता थरथरेल; तुपकरांचा स्फोटक ‘प्रहार’

Leaders are not South’s superheroes, power will shake only if farmers wake up; Tupkar’s explosive attack : आंदोलनाने काहीच होत नसेल तर मग तुमच्या चळवळीला बुडवणारे नेतेच जबाबदार

Nagpur : शेतकरी चळवळीला हवा असलेला उग्र आवाज रविकांत तुपकर यांच्या भाषणातून पुन्हा एकदा घुमला आहे. “तुमच्या डोक्यात काय आहे, यापेक्षा तुमची डोकी किती आहेत हे महत्वाचं,” असं सांगत तुपकरांनी शेतकऱ्यांना संख्या आणि संघटनशक्तीतून लढण्याचं थेट आव्हान दिलं. सिनेमा आणि वास्तव यातील तफावत अधोरेखित करत त्यांनी तुफानी भाषणात स्पष्ट केलं की, बच्चू कडू, महादेव जानकर, वामनराव चटप ही माणसं काही साऊथची हिरो नाहीत की एका फाईटमध्ये १० जणांना पाडतील आणि लगेचच कर्जमाफी होईल.

तुपकरांच्या या विधानांनी राजकीय नेत्यांच्या एकट्या रणांगणात उतरणाऱ्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. शेतकरी चळवळ ही व्यक्तीपुरती नाही, ती लाखोंच्या डोक्यांनी पेटते आणि लाखोंच्या पावलांनी पुढे जाते, असे सांगत त्यांनी संघटनशक्तीवर भर दिला. नागपुरात आंदोलन झालं, मग पुण्यात शांतता कशाची होती, असे म्हणत नागपुरातील आंदोलनाला उपस्थिती मिळाली, पण त्याचं धडाक्यात पुणे शांत का, असा थेट सवाल तुपकरांनी उपस्थित केला.

Local body election : ठाण्यात भाजपा – शिवसेना शिंदे गटात भीषण राडा

एक आंदोलन पुरेसं नसतं. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर शेतकरी जमला पाहिजे. रोज जमला पाहिजे. दडपण वाढलं की सत्ता झुकते, पण ते दडपण दिसायला हवं, शेतकरी प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या नेत्यांनाही तुपकरांनी चिमटा काढला. केवळ भाषणांनी कर्जमाफी मिळत नाही. फेसबुक लाइव्ह आणि मोठे बॅनर लावून चळवळ उभी राहत नाही. शेतकऱ्यांनी एकदिलाने उभं राहिलं तरच सरकार हालणार आहे, असं ते म्हणाले.

Local body election : भाजप नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध; पुन्हा घराणेशाहीच्या चर्चा !

जर शेतकरी स्वतः उठला नाही तर कुणीही त्याच्यासाठी लढणार नाही. कर्जबाजारीपणामुळे त्रस्त, आत्महत्यांकडे ढकलला जाणारा शेतकरी आजही तुटक आणि तुकड्यांत लढतो आहे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. म्हणूनच त्यांनी मोठ्या चळवळीची तयारी करण्याचं आवाहन केलं. ग्रामीण पातळीवर स्फोटक आंदोलनांची मालिकाच सुरू करा. मगच सरकारला ऐकावंच लागेल. तुपकरांच्या या आक्रमक हाकेनं शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळणार का, हे पाहणं आगामी काही दिवसांत महत्वाचं ठरणार आहे.