Farmers morcha : माझ्या नादाला लागला तर ‘तिथं’ नांगराचा फाळ घालीन

Sadabhau Khots tongue slipped, warning to cow vigilantes : सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, गोरक्षकांना इशारा

Sangola : महायुतीचे आमदार व शेतकरी संघटनेतील नेते सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांच्या धमक्यांना थेट गावरान भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. सांगोल्यात जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या आंदोलनानंतर खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना सतत धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करताना ते संतापले आणि भाषणाच्या ओघात त्यांची जीभ घसरली.“आजवर शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गाईची विक्री केलेली नाही.

हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. मग गाईच्या गाड्या का अडवता? मी शेतकऱ्यांची बाजू घेतली, म्हणून मला धमक्या द्यायला सुरुवात झाली. पण लक्षात ठेवा, माझ्या नादाला लागू नका. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, माझ्या हातात नांगराचा फाळ आहे, आणि जर गरज पडली तर तो नांगराचा फाळ तुमच्या xxx मध्ये घालीन,” असं खोत यांनी थेट मंचावरून सांगितलं.

Entry into BJP : खासदार प्रतिभा धानोरकरांच्या दीराचा भाजपात प्रवेश

सांगोल्यातील या भाषणानंतर सदाभाऊ खोत यांची तीव्र प्रतिक्रिया आणि जीभ घसरल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोरक्षकांच्या धमक्यांना गावरान पद्धतीने उत्तर देताना त्यांनी शेतकऱ्यांचा इतिहास मांडला, मात्र आक्रमक भाषेमुळे खोत यांच्या वक्तव्याची चर्चा जोरात रंगली आहे.