buldhana-khamgaon-farmer-suicide-due-to-illegal-money-lending-harassment-case-filed : शेती परत मिळवण्यासाठी तिघांनी केला मानसिक छळ; गळफास घेत शेतकऱ्याने संपवले जीवन, तिघांवर गुन्हे दाखल
Khamgao शहरानजीकच्या वाडी येथील सावकारीच्या जाचातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीड लाख रुपये व्याजाने घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात गहाण ठेवलेली शेती परत मिळवण्यासाठी अतिरिक्त २० लाख रुपयांची मागणी करत वारंवार मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भास्कर लक्ष्मण तायडे (वय ५५, रा. भीमनगर, वाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आरोपी सोमेश्वर नामदेव दामोदर (वय ६१), प्रवीण संतोषराव खारोडे उर्फ निखिल देशमुख (वय ३७) आणि विजय त्र्यंबक इंगळे (वय ४५) यांच्याकडून १ लाख ४९ हजार रुपये व्याजाने घेतले होते आणि त्या बदल्यात आपली शेतजमीन गहाण ठेवली होती.
Maize producer farmers : २० लाख क्विंटल उत्पादन, खरेदी फक्त ६० हजार! मका उत्पादक हवालदिल
तायडे यांनी कर्जाची मूळ रक्कम परत केल्यानंतर शेती पुन्हा त्यांच्या नावावर करण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. मात्र, आरोपींनी नियत बदलत मूळ रक्कमेपेक्षा अनेक पटींनी जास्त म्हणजेच तब्बल २० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचा आरोप आहे. या अवाजवी मागणीसाठी वारंवार मानसिक त्रास आणि दबाव देण्यात येत असल्याने तायडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी गजानन तुळशीराम वाघोदे (वय ५९, रा. तायडे कॉलनी, खामगाव) यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(२)(५) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.
Sanjay Raut : राज्यसभा- विधान परिषद निवडणुकीवर महाविकास आघाडीत चर्चेची लगबग
आत्महत्येपूर्वी तायडे यांनी आरोपींच्या नावाचा उल्लेख असलेली एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. सावकारीच्या वाढत्या जाचामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.








