Breaking

Farmers suicide : राजकीय अनास्थेमुळे रोज तीन शेतकऱ्यांचे बळी !

Mahayuti Government not serious on farmers issue : शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयात शासन गंभीर नाही.

Amravati शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही किती गंभीर आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून होत असतो. मात्र तरी कोणत्याही ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. शेतीमालाला भाव नाही व दुसरीकडे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. पेरणी केल्यानंतर होणारा खर्च निघण्याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत दररोज तीन शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याचे चित्र अमरावती विभागात दिसून येत आहे.

पश्चिम विदर्भात 2024 मध्ये ३६५ दिवसांत १०५१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासन-प्रशासन शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयात गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हे शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत. शासनाद्वारे गठित वसंतराव नाईक शेतकरी आत्महत्या मिशनद्वारा ठोस उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे. केवळ यवतमाळ नव्हे तर वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातही वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या घटना होत आहे.

Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू !

विभागीय आयुक्तालयाद्वारे हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात ८७, फेब्रुवारी ९४, मार्च १०६, एप्रिल ९४, मे ८१, जून ७१, जुलै ७२, ऑगस्ट ८७, सप्टेंबर ८५, ऑक्टोबर १०९, नोव्हेंबर ८५ व डिसेंबर महिन्यात ८० अशा एकूण १०५१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे.

नैसर्गिक आपत्ती, नापीकी, बँकांसह, सावकारांचे कर्ज, कर्जासाठी तगादा मुलींचे लग्न आजारपण यांसह इतर बाबींसाठी पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे वास्तव आहे.

CM Devendra Fadnavis : राज ठाकरे मित्र आहेत; उद्धव ठाकरे शत्रू नाहीत !

दरवर्षी हजारावर आत्महत्या

विभागात १० वर्षांचा आढावा घेता दरवर्षी एक हजारांवर शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. यामध्ये सन २०१५ मध्ये ११८४, सन २०१६ मध्ये ११०३, सन २०१७ मध्ये १०६६, सन २०१८ मध्ये १०५३, सन २०१९ मध्ये १०५५, सन २०२० मध्ये ११३६, सन २०२१ मध्ये ११८३, सन २०२२ मध्ये १२०२, सन २०२३ मध्ये ११५८ तर २०२४ मध्ये १०५१ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.