February electricity bill is likely to be higher due to demand : तापमान वाढल्याने मागणीही वाढली; नागरिकांना टेंशन
Wardha ग्लोबल वाॅर्मिंगचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच विजेची मागणी वाढायला सुरुवात झाली आहे. कृषिपंपाचा वाढलेला वापर आणि तापमानवाढीमुळे निर्माण झालेला उकाडा यामुळे राज्यातील विजेची मागणी २७ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. जिल्ह्यात उकाडा मोठ्या प्रमाणात वाढल्याने दिवसा व रात्री पंखे, एसीचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बिल वाढण्याची शक्यता आहे.
यंदा फेब्रुवारीतच जिल्ह्याचे तापमान सातत्याने उच्चांक गाठत आहे. तापमानाचा परिणाम आरोग्यावर जाणवत आहे. त्यातच उकाडा वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. साधारण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कुलर सुरू केले जातात. मात्र, यंदा फेब्रुवारीपासूनच वातावरणात उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. उकाड्यापासून सुटका करण्यासाठी नागरिकांना पंखा, कूलरचा वापर करावा लागत आहे. विपरीत परिस्थितीमुळे विजेच्या वापरात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
Collector of Amravati : सण असो वा उत्सव, भोंग्याच्या आवाजाला असेल Limit !
अलीकडे महावितरणच्या वतीने मागेल त्याला सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. त्यातच कृषिपंपासाठी वीज कनेक्शन दिले जात नाही. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांचा कल सौरउर्जेकडे कल वाढला आहे. घरगुती वीज ग्राहकांसाठी महावितरणच्यावतीने प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Sahasram Korote : काँग्रेसने मला अंधारात ठेवले, विश्वासघात केला !
जिल्ह्यात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. हरभरा, गहू, भाजीपाला व इतर रब्बी पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे कृषिपंपांकरिता वीजवापर वाढला आहे. यंदा फेब्रुवारी सुरू होताच उकाडा जाणवत आहे. येणाऱ्या दिवसांत उकाड्यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे कूलर, पंखे, ‘एसी’चा वापर वाढणार असून, त्याकरिता विजेच्या मागणीतही वाढ होणार आहे. परिणामी, विजेच्या वाढत्या वापरानुसार वाढीव बिलही हाती पडणार आहे.