Financial status : महाराष्ट्राची आर्थिक ताकद थक्क करणारी!

Centres share low, 73% of revenue comes from own sources. : 0.केंद्राचा अत्यल्प वाटा ७३% महसूल स्वतःच्या स्रोतांतून

Mumbai : केंद्र सरकारवर अवलंबून न राहता स्वतःच्या कर व बिगरकर उत्पन्नाच्या बळावर महसूल उभारणी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नियंत्रक व महालेखापरीक्षक – कॅग) यांच्या ताज्या अहवालानुसार, महाराष्ट्राच्या महसूल प्राप्तीपैकी तब्बल ७२.५४ टक्के हिस्सा राज्य स्वतः निर्माण करत आहे.

देशातील अनेक राज्ये केंद्राच्या करवाटप व अनुदानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र महाराष्ट्र या बाबतीत वेगळा ठरतो. ईशान्येकडील राज्ये, बिहार आणि हिमाचल प्रदेश यांचा स्वतःच्या कर व बिगरकर उत्पन्नाचा वाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. उलट, महाराष्ट्र स्वतःच्या स्रोतांवर उभा राहून देशातील आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम राज्य म्हणून अधोरेखित झाला आहे.

Vijay Thalapathy : करुरमध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी !

राज्याची महसूल तूटही नियंत्रणात असून ती केवळ १,९३६ कोटींवर आली आहे. ही तूट जीएसडीपीच्या फक्त ०.०५ टक्के आहे. देशातील १२ महसूल तुटीतील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असला तरी इतकी कमी तूट ही राज्याच्या वित्तीय शिस्तीचे द्योतक आहे.

केंद्र सरकारकडून २०२२-२३ मध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या अनुदान व साहाय्यातील हिस्सा ८.६९ टक्के इतका होता. करवाटप व अनुदान या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र देशातील अव्वल सहा राज्यांमध्ये आहे. याच वर्षी महाराष्ट्राने तब्बल ४.०५ लाख कोटी रुपयांचा महसूल उभारला. राज्याच्या एकूण खर्चापैकी ३२ टक्के हिस्सा पगार, व्याज आणि पेन्शनवर खर्च झाला.

Sudhir Mungantiwar : कृषी पंप हा चंद्रपूरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्क !

या अहवालामुळे पुन्हा सिद्ध झाले आहे की महाराष्ट्र स्वतःच्या आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर देशाच्या प्रगतीत सर्वात मोठे योगदान देत आहे.