Congress Demands Declaration of Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी
Lonar राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
लोणार तहसील कार्यालयात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष आश्रुजी फुके यांच्या नेतृत्वात हे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हा आंदोलनात्मक कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार पार पडला.
निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने आजवर कोणतीही ठोस मदत जाहीर केलेली नाही. शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून, सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
Sonam Wangchuk case : सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध — अकोल्यात निघाला भव्य कॅन्डल मार्च!
काँग्रेसने सातत्याने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करणे आणि प्रती हेक्टरी ₹५०,००० मदत या मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. तरीही त्या अमलात न आणल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त करण्यात आली.
Gram Sabha of Anjani Gram Panchayat : दारुबंदीसाठी पुरुषांचा पुढाकार, ग्रामसभेने केला ठराव
शेतकऱ्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे कोणतेही पथक राज्यात आले नसल्याने काँग्रेसने केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवरही तीव्र शब्दात टीका केली. “शेतकऱ्यांच्या अडचणींकडे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी पाठ फिरवली आहे,” असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले.
“शेतकऱ्यांच्या हितार्थ वरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.