Breaking

Flood situation : बोर्डा, चिचपल्लीची पुनरावृत्ती होऊ नये, मामा तलाव तातडीने दुरूस्त करा !

Mungantiwar told the borda and Chichpalli should not be repeated, repair Mama Lakes immediately : तीन दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून तात्काळ कामे सुरू करावी

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील बोर्डा आणि चिचपल्ली या गावांमध्ये तलाव फुटून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता तशी परिस्थिती येऊ नये म्हणून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मामा तलावांसह इतर तलावांच्या दुरूस्तीच्या कामांना वेग द्यावा, असे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचन विभागाला दिले.

नियोजन भवन येथे मामा तलाव व लपा तलावासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप खांबाईत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सुरज पेद्दुलवार आदी उपस्थित होते.

Scheme For Farmers : मुनगंटीवार म्हणाले, अॅग्रीस्टॅकचे लाभ मिळवा, ‘फार्मर आयडी’ बनवा !

कसरगट्टी ६.२५ लाख, बोर्डा बोरकर ६.३० लाख आणि चेक आंबेधानोरा १० लाख या दुरूस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तिन्ही कामांसाठी तीन दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून तात्काळ कामे सुरू करावी, असे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले. गेल्या वर्षी बोर्डा व चिचपल्ली येथे तलाव फुटून पूर परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे यावेळी विशेष काळजी घेण्यावर भर देण्यात येत आहे.

Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन

विभागाने बल्लारपूर मतदारसंघातील सर्व तलावांची यादी तयार करून त्यांच्या सिंचन क्षमतेसह दुरूस्तीची गरज, खोलीकरण आदी बाबींचे निरीक्षण करून संबंधित विभागाचे रिमार्क्स द्यावे. प्रत्येक तलावातील एकत्रित सिंचन क्षमता आणि खर्चाच्या अंदाजपत्रकाची माहिती सादर करावी. चिचाळा व कवडपेठ दरम्यान नव्याने बांधलेल्या तलावाच्या वेस्ट वेअरची उंची जास्त असल्यामुळे यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करावी. बोर्डा तलावाचे अंदाजपत्रक सोमवारी तयार होणे अपेक्षित आहे. मोलझरी तलावासाठी तापूर्वी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. उर्वरित कामांसाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांकडून मदतीचा हात अन् सुरेखा शिंदे स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या!

दाबगाव मक्ता व आलेवाही येथील मामा तलावांच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करावे. तसेच दाबगाव तुकूम, आलेवाही नवरगाव – सर्वे नं. १०, कांतापेठ रयतवारी – सर्वे नं. ३५, चिचपल्ली, मुरमाडी – सर्वे नं. ३१, विहीरगाव येथील मामा तलावांच्या दुरूस्तीच्या कामांसाठी कार्यादेश आधीच देण्यात आले आहेत. काही कामांना सोमवारपासून (ता. २६) कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मामला तलाव गेट दुरूस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. सर्व उर्वरित कामांना २७ मे पर्यंत मंजुरी मिळवण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.