Food Security Policy : हे कसले अन्नसुरक्षा धोरण? १५ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार

Ration grain for 15,000 beneficiaries will be stopped : सहा महिन्यांपासून रेशन उचलले नाही, पुरवठा विभागाचा निर्णय

Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल १५ हजारांहून अधिक रेशनकार्डधारकांनी गेल्या सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्य उचलले नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने या कार्डधारकांची यादी ‘सायलेंट आरसी’ म्हणून तयार करून जिल्हास्तरावर पाठविली आहे. आता या कुटुंबांचे रेशन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारकडून गाजवून सांगितल्या जाणाऱ्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत लाभ मिळणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गट योजनांमध्ये मोठ्या संख्येने कुटुंबांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या ६३,७९३ अंत्योदय रेशनकार्ड असून त्यात २,६७,७०२ सदस्य लाभ घेतात. तर प्राधान्य कुटुंब गटांतर्गत ३,९७,३९४ रेशनकार्ड व १६,४९,५०९ सदस्यांची नोंद आहे. मात्र यातील ६,७५१ रेशनकार्डधारक (सदस्यसंख्या १५,९३०) यांनी सहा महिन्यांपासून धान्य उचललेले नाही.

Vidarbha Farmers : बुलढाण्यात सात महिन्यांत १०२ शेतकरी आत्महत्या

जर कोणत्याही लाभार्थ्याने सलग सहा महिने धान्य उचलले नाही, तर त्याचे कार्ड निष्क्रिय केले जाते आणि त्याचा लाभ तात्पुरता बंद होतो. शासनाच्या नियमानुसार लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधितांनी स्थानिक कार्यालयात अर्ज करून आवश्यक कागदपत्रे दाखल करावी लागतात.

BJP NCP : भाजपाचे आमरण उपोषण, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाण्यात उडी घेण्याचा इशारा

सरकार जनतेसाठी आणलेल्या अन्नसुरक्षा योजनांचा गाजावाजा करते, पण प्रत्यक्षात हजारो कुटुंबे लाभापासून वंचित राहत आहेत. स्थलांतर, आधार-लिंकिंग, बायोमेट्रिक बिघाड किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गरीब कुटुंबांना अन्नधान्यापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप विरोधक करत आहेत.

DPC Meeting of Buldhana : दुहेरी नेतृत्वाने विकासाला गती मिळणार?, डीपीसी बैठक २५ ला

पुरवठा विभागाने ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे कार्डही बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. आधार कार्डासह लाभार्थ्यांनी रेशन दुकान किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.