Breaking

Girish Mahajan : भाजपचा दुपट्टा टाकला होता, असे म्हणत महाजनांचा खडसेंना टोला !

What did Minister Mahajan say about Eknath Khadse’s entry into BJP : त्यांचे कनेक्शन दिल्लीत आहे, मी टिपणी करणार नाही

Nagpur : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यास किती इच्छुक आहेत, हे दिसून येत आहे. द्यांचे कनेक्शन थेट दिल्लीत आहे. मी त्यांच्याबद्दल टिपणी करणार नाही. कारण मी लहान कार्यकर्ता आहे. ते राष्ट्रीय नेते आहेत. दिल्लीत भाजपचा दुपट्टा टाकल्याचे ते बोलले होते. पण त्याचे फोटो कधीही समोर आले नाहीत, असे म्हणत राज्याचे जलसंसाधन मंत्री गिरीष महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेश ‘न भुतो’ गाजला. त्यानंतर ‘त्याच्यापेक्षा मी वाईट नाही, मला का घेत नाही?’, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. यासंदर्भात नागपुरात आज (ता. २२ जून) पत्रकारांनी मंंत्री गिरीष महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे संघाच्या कार्यक्रमात आले होते. पण मला त्याबद्दल फारसे काही माहिती नाही. त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हतं. पण तरीही ते येऊन गेले, असेही महाजन यांनी सांगितले.

Iran-Israel War : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर मोठा हवाई हल्ला!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत काल (ता. २१ जून) नागपुरात झाली. यावेळी ‘पिक्चर अभी बाकी है..’, असे वक्तव्य गडकरींनी एका उत्तरात केले. यासंदर्भात विचारले असता, खरंच हे ट्रेलर आहे आणि पिक्चर बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. आतापर्यंत जे काम झालं, ते कधी कुणी स्वप्नातही पाहिलं नसेल. इतके काम गेल्या ११ वर्षांत झाले आहे. अजून चार वर्ष शिल्लक आहेत. या काळात देशाची अर्थव्यवस्था पुढे न्यायची आहे. आता पुढील चार वर्षात काय-काय होते, ते पाहावे, असे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.