Emotional application from a single youth to Sharad Pawar : अविवाहित तरुणाचा शरद पवारांना भावनिक अर्ज
Akola : सोशल मीडियावर सिंगल आणि अविवाहित तरुणांची थट्टा उडवली जाणाऱ्या या काळात, एका खऱ्या अर्थाने अस्वस्थ तरुणाने आपल्या वैयक्तिक आयुष्याची वेदना राजकारण्यापर्यंत पोहोचवली आहे. अकोला जिल्ह्यातील या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना भावनिक पत्र लिहून “माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही,” असे साकडे घातले आहे. त्याचे हे पत्र सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
शनिवारी अकोल्यात शरद पवार शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी पवारांना आपली निवेदनं दिली. त्यापैकीच एका निवेदनात या तरुणाने आपली वैयक्तिक व्यथा मांडली होती. पत्रात त्याने लिहिले आहे की, “माझे वय वाढत चालले आहे. आता लग्न होईल की नाही याची चिंता वाटते. एकटेपण असह्य झाले आहे. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे. मी तिच्यासोबत चांगला संसार करेन. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही.”
Satyendra Bhusari : धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेस नेते डॉ. भुसारी यांचे निधन
या भावनिक निवेदनात त्याने स्वतःचा पत्ता आणि मोबाईल क्रमांकही नमूद केला आहे. हे पत्र वाचल्यानंतर शरद पवारांसह व्यासपीठावरील नेतेही क्षणभर अवाक झाले. कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांमध्येही यामुळे एकच कुजबुज सुरू झाली.
दरम्यान, ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत चालल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. शिक्षण, नोकरी आणि जीवनमानाच्या अपेक्षा वाढल्याने ग्रामीण भागातील तरुणांना विवाहासाठी मुली मिळण्यात अडचणी येत आहेत. सुशिक्षित मुलींचा कल शहरातल्या नोकरदार मुलांकडे वाढला आहे. त्यामुळे शेती करणारे किंवा ग्रामीण भागातील तरुण अनेकदा विवाहबाह्य राहतात. या सामाजिक वास्तवाचे दुःख या तरुणाच्या पत्रातून स्पष्टपणे दिसून येते.
Local Body Elections : नगराध्यक्षपदांचा तिढा कायम; सत्तासमीकरणाचा वाद राज्यस्तरावर!
आता शरद पवार या तरुणाची विनंती कितपत लक्षात घेतात आणि त्याच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवू शकतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.








