Gondia Farmers : भाजीपाला लागवडीत गोंदिया होतोय स्वावलंबी !

Vegetable cultivation option chosen by the Rice Farmers in Gondia District : धान उत्पादकाने निवडला पर्यायी मार्ग;

Gondia जिल्हा धानाचे कोठार आहे. तरीही धान शेती करणारा शेतकरी आजही पाहिजे तसा समृद्ध झालेला नाही. शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी त्याला विविध पिकांची लागवड करावी लागणार आहे. यासाठीच कृषी विभागाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. यातूनच आता शेतकरी धानाला पर्याय म्हणून नवनवी पीके घेत आहे. भाजीपाल्यासाठी अन्य जिल्ह्यांवर अवलंबून राहू नये, या दृष्टीने स्वतःच भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळला आहे. यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात तब्बल १९८६.७१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली आहे.

जिल्ह्यात धान पीक प्रामुख्याने घेतले जाते. भाजीपाला लागवड शेतकरी आपल्यापुरतीच करीत होते. हेच कारण आहे की, गोंदियात अन्य जिल्हे व राज्यांतून भाजीपाला आणावा लागत आहे. आपल्याकडे शेती, पाणी व वातावरणाची साथ आहे. शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळत नसल्याचे हे परिणाम आहे. परिणामी बाहेरून येणारा भाजीपाला एकतर महाग पडतो. शिवाय, आपला शेतकरी रिकामा बसून राहतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे या दृष्टीने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीकडे वळविले जात आहे.

Mahayuti Government Farmers : सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची कोंडी !

याचे फलितही दिसून येत आहे. यंदा रब्बीतील ९ जानेवारीपर्यंतची आकडेवारी बघता जिल्ह्यात १९८६.७१ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवलंबून राहण्याची गरज नाही
जिल्ह्यात बहुतांश भाजीपाला परजिल्हे व राज्यांतून येतो. परिणामी येथे येईपर्यंत त्याचे दर वाढतात व नागरिकांना जास्तीचा पैसा मोजावा लागतो. अशात येथील शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग अंमलात आणल्यास भाजीपाला बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही व जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच राहणार. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे वळण्याची गरज आहे.

Sudhanshu Maharaj on Narendra Modi : सुधांशू महाराजांची पंतप्रधानांवर स्तुतिसुमने

हिरवी मिरचीचा ‘गोडवा’!
शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळत असतानाच त्यांनी हिरवी मिरची लागवडीचा प्रयोग केला आहे. यातूनच यंदा ४२४ हेक्टरमध्ये हिरवी मिरची लागवड करण्यात आली आहे. पूर्वी जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातच मिरची लागवड केली जात होती. आता मात्र देवरी तालुक्यातील शेतकरीही त्याला जोड देत आहे. यंदा अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २०२.१० हेक्टरमध्ये, तर देवरी तालुक्यात २२१.९० हेक्टर क्षेत्रात हिरवी मिरची लागवड करण्यात आली आहे.