CM Devendra Fadnavis to Hold Meeting with Officials : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार अधिकाऱ्यांची बैठक
Nagpur : राज्य सरकारने शासकीय कंत्राटदारांची बिले अडवून ठेवल्यामुळे महाराष्ट्रातील सांगली येथे एका कंत्राटदाराने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर नागपुरातील संविधान चौकात कंत्राटदारांनी भिक मांगो आंदोलन केले होते. या आंदोलनानंतरही काही तोडगा न निघाल्याने नागपुरातील कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांनी गेल्या आठवड्यातच मृत्यूला कवटाळले. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आणि कंत्राटदारांची देयके देण्याच्या कार्यवाहीला वेग आला.
आता लवकरच कंत्राटदारांना देयके मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची यंदाची दिवाळी चांगली जाणार असं दिसतंय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात येत्या आठ ते १० दिवसांत अधिकाऱ्यांची बैठक गेणार असल्याची माहिती आहे. कंत्राटदारांच्या थकीत देयकांची रक्कम काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये छोट्या कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Local Body Elections : अजित पवारांची राष्ट्रवादी नागपुरात करणार चिंतन !
यासंदर्भात कंत्राटदार असोसिशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे म्हणाले की, आम्ही दोन वर्षांपासून थकीत देयके मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गेल्या आठवड्यात यासाठी आम्ही भिक मांगो आंदोलनही केले. त्याची दखल शासनाने घेतली आहे. दरम्यान आमचे सहकारी हॉटमिक्स कंत्राटदार मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केली. त्यापूर्वी सांगली येथेही एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. याची माहिती आम्ही काल सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर कुणीही आत्महत्येसारखे घातक पाऊन उचलू नये. आम्ही येत्या आठ ते १० दिवसांत सर्व देयके देण्यास सुरूवात करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सांगितले.