The reason for the financial crisis is the lack of funds. : आर्थिक तंगीचे कारण, निधी पुरवठ्याचा हात आखडता
Mumbai: राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारने सुरु केलेली आणखी एक योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी ही योजना जवळपास बंद पडल्यात जमा असताना आता ‘आनंदाचा शिधा’ या लोकप्रिय योजनेचीही तीच गत होण्याची शक्यता आहे. राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावे, यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केले जायचे. यामध्ये एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता. तो लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयांत दिला जायचा. 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने, तसेच 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते. मात्र, यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Flood-Affected Farmers : शासन निष्क्रीय, शेतकऱ्यांबद्दल उदासीन, काँग्रेसची टीका
यंदा राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेती आणि घरादारांचे नुकसान झाल्यामुळे येथील सामान्य जनता हवालदिल झाली आहे. अशा परिस्थितीत किमान या परिसरात तरी सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ पुरवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपली असताना सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने यंदा या भागांमध्येही ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sonam Wangchuk case : सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध — अकोल्यात निघाला भव्य कॅन्डल मार्च!
महायुती सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनेक लोकप्रिय योजना आणि घोषणांचा सपाटा लावला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर आर्थिक तंगीचे कारण पुढे करत राज्य सरकारने या योजनांना निधी पुरवठा करण्यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे या योजना बंद झाल्या का, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून कोणतीही योजना बंद झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोफत वीज, शिवभोजन थाळी, तीर्थाटन योजना, लाडकी बहीण योजना या योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
दसरा-दिवाळी या उत्सवांच्या काळात आनंदाचा शिधा दिला जात होता. योजना सुरु झाल्यानंतर एक कोटी 72 लाख शिधापत्रिकाधारकांनी योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे इतर योजनांचे गणित बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.








