व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Graduate constituency : नागपूर पदवीधर मतदारसंघ: जात पडताळणी प्रकरणावरून आमदार अभिजित वंजारी...

Graduate constituency : नागपूर पदवीधर मतदारसंघ: जात पडताळणी प्रकरणावरून आमदार अभिजित वंजारी भाजपच्या रडारवर

MLA Abhijit Wanjari on BJP’s radar over caste verification issue : संस्थेतील जात प्रमाणपत्र  घोटाळ्यावरून घेतल्याच्या तयारीत

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ येत असतानाच राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची नोंद करणाऱ्या आमदार अभिजित वंजारी यांनाच काँग्रेस पुन्हा मैदानात उतरवणार असल्याचे चिन्हे आहेत. मात्र, त्यांच्या संस्थेच्या महाविद्यालयात समोर आलेल्या कथित ‘जात प्रमाणपत्र घोटाळ्या’मुळे भाजपने आतापासूनच त्यांना घेरण्यास सुरुवात केली असून, हा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरण्याची शक्यता आहे.

अभिजित वंजारी सचिव असलेल्या ‘अमर सेवा मंडळ’ संस्थेमार्फत गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चालवले जाते. या महाविद्यालयात १० विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे खऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला गेल्याचा आरोप भाजपने केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ‘अनुसूचित जाती-जमाती जात वैधता पडताळणी समिती’च्या सहायक आयुक्तांकडे करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, या घोटाळ्यातील सत्य शोधण्यासाठी महाविद्यालयातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेऊन त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही भाजपने लावून धरली आहे.

Ias officers transfer : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा !

मागील निवडणुकीत अभिजित वंजारी यांनी भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांचा धक्कादायक पराभव केला होता. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात पक्षाला प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला होता. यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व स्व. गंगाधरराव फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी आमदार अनिल सोले यांनी केले होते. २०२० च्या निवडणुकीत भाजपने अनिल सोले यांचे तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे पक्षात मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणि भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे वंजारी यांचा विजय सुकर झाला होता.

America iran ceasefire : अमेरिका–इराण तणावात मोठा दिलासा; दोन आठवड्यांच्या युद्धविराम !

आता अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ संपत असून पुन्हा निवडणूक होत आहे. भाजपने यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली असून, तेच पक्षाचे उमेदवार असतील अशी घोषणाही केली आहे. कोहळे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, राज्यातील बदलेली राजकीय समीकरणे वंजारींसाठी आव्हानात्मक ठरू शकतात. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नाही, शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा वंजारी यांच्या अडचणीत वाढ करणारा ठरू शकतो. भाजप याच मुद्द्याला प्रचाराचे हत्यार बनवून हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

error: Content is protected !!