Gram Panchayat elections : ना मुदतवाढ, ना प्रशासक, सरपंच संभ्रमात

27 gram panchayats in Sangrampur taluka on waiting : संग्रामपूर तालुक्यात २७ ग्रामपंचायती अधांतरी

Sangrampur तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत ९ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतरही ना मुदतवाढ, ना प्रशासक नियुक्ती—अशा अनिश्चित स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अडकले आहे. अधिकृत आदेश नसल्याने विद्यमान सरपंच “आपण पदावर आहोत की नाही?” या संभ्रमात असून ग्रामपंचायतींचे कामकाज दोन दिवसांपासून ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंचायत समितीकडून प्रशासकीय आदेश अद्याप न आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुदत संपलेल्या सरपंचांनी कोणतेही लेखी निर्देश नसतानाही आपापल्या डीएससी स्वेच्छेने जमा केल्याचे समजते. निवडणुका वेळेत न झाल्याने विद्यमान सरपंचांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनांनी उच्च न्यायालयात केली असून पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे.

Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुका लांबल्याने इच्छुकांना ‘विश्रांती’

२० फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान प्रभाग रचना व हरकतींचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी निवडणुका किमान तीन-चार महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी आवार, कोद्री, उकळी, वरवट खंडेराव, पातुर्डा, बोडखा, वानखेड, सोनाळा, पळसोळा, अकोली, चांगेफळ, तामगाव, बावनबीर, टुनकी, लाडनापुर, वसाडी, आलेवाडी आदी २७ गावांतील प्रशासन ‘वाऱ्यावर’ असल्याची टीका होत आहे.

Gram Panchayat ELections : मोताळा तालुक्यातील ५२ गावात राजकारण तापणार

“मुदतीत निवडणूक होणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे; परंतु प्राथमिक तयारीही न झाल्याने अनिश्चितता वाढली आहे,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. एकतर विद्यमान सरपंचांना मुदतवाढ द्यावी किंवा तातडीने प्रशासक नेमावा, अशी मागणी जोर धरत असून वरिष्ठ पातळीवरून तातडीचा तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.