Protest over non-payment of honorarium : ११ महिन्यांपासून मानधन थकित, उपोषणाचा इशारा
Buldhana शासनाने निश्चित केलेले मानधन गेल्या अकरा महिन्यांपासून मिळाले नसल्यामुळे ग्राम रोजगार सेवक संघटना संतप्त झाली असून, त्यांनी २२ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात सिंदखेड राजा येथील नायब तहसीलदार प्रांजल पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास कुटुंबासह उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन आणि २ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता, असे मिळून १० हजार रुपये मासिक मानधन देण्याचा शासन निर्णय जारी केला होता. मात्र, अंमलबजावणी न झाल्यामुळे अकरा महिन्यांहून अधिक काळ सेवकांना मानधन मिळालेले नाही. परिणामी, रोजगार सेवकांपुढे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असून कुटुंबीय अक्षरशः उपासमारीच्या संकटात सापडले आहेत.
Khadakpurna Dam : खडकपूर्णा प्रकल्पाचे पुन्हा सर्वच १९ दरवाजे उघडले!
या परिस्थितीत ग्राम रोजगार सेवकांनी हतबल होऊन कामबंद आंदोलन सुरू केले. तसेच रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी किंवा मजूर मित्रांकडून करून घेऊ नयेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा सर्व ग्राम रोजगार सेवक आपल्या कुटुंबासह पंचायत समिती, सिंदखेड राजा येथे उपोषणास बसतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.








