From milk and cheese to AC… see what has become cheaper : दूध-पनीरपासून एसीपर्यंत… पहा काय झाले स्वस्त
New Delhi : आज सोमवारपासून २२ सप्टेंबर पासून देशभरात नवीन वस्तू आणि सेवा कर जीएसटी 2.0 लागू झाला आहे. कर रचना सोपी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. याचा थेट परिणाम बाजारपेठेत दिसून येईल. अनेक जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचे दर आता कमी होणार आहेत, तर चैनीच्या आणि आरोग्यासाठी हानिकारक वस्तू महागणार आहेत.
यापूर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते ५%, १२%, १८% आणि २८%. यातून गोंधळ वाढत होता. आता ही रचना सुलभ करून केवळ दोन स्लॅब ठेवले आहेत ५% आणि १८%. तर तंबाखू, पान मसाला, दारूसारख्या हानिकारक पदार्थांवर ४०% पर्यंत ‘सिन टॅक्स’ आकारण्यात येणार आहे.
Ladki Bahin Scheme : लाडक्या जावयांचाही डेटा सरकारच्या रडारवर, उत्पन्न तपासले जातेय
जीएसटी 0% – पूर्णपणे जीएसटीमुक्त वस्तू
खाद्यपदार्थ : दूध, चीज, पिझ्झा, सर्व प्रकारची ब्रेड, रेडी टू ईट पोळी-पराठे, शैक्षणिक साहित्य : पेन्सिल, नोटबुक, ग्लोब, चार्ट, सराव पुस्तके. आरोग्य : ३३ जीवनरक्षक औषधे, आरोग्य व जीवन विमा पॉलिसी
जीएसटी 5% – स्वस्त होणाऱ्या वस्तू
खाद्यपदार्थ : तूप, लोणी, साखर, मिठाई, पास्ता, बिस्किटे, चॉकलेट, रस, नारळ पाणी पर्सनल केअर : शाम्पू, साबण, हेअर ऑईल, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम घरगुती वापर : भांडी, बाळाच्या बाटल्या, छत्र्या, नॅपकिन्स/डायपर्स, फर्निचर, हँडबॅग्ज शेती उपकरणे : ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री, ठिबक व स्प्रिंकलर, पंप हेल्थ प्रॉडक्ट्स : थर्मामीटर, ग्लूकोमीटर, ऑक्सिजन, चष्मे, ग्लोव्ह्ज कापड/पोशाख : तयार कपडे (₹२,५०० पर्यंत), ज्यूट/कापसाच्या पिशव्या इतर : हस्तकला, हस्तनिर्मित कागद, विटा-फरशा
जीएसटी 18% असणाऱ्या वस्तू इलेक्ट्रॉनिक्स : एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, एलईडी/एलसीडी टीव्ही, प्रोजेक्टर वाहने : लहान कार, तीनचाकी, रुग्णवाहिका, ३५० सीसीखालील बाईक, व्यावसायिक वाहने सेवा क्षेत्र : चित्रपट तिकीट ₹१०० पेक्षा कमी, ब्युटी पार्लर सेवा, हॉटेल रूम ₹७५,००० पेक्षा कमी दररोज इंधन उपकरणे : पंप, हायड्रॉलिक यंत्रणा
विमा प्रीमियममध्ये दिलासा, पूर्वी विमा सेवांवर १८% कर लागू होता. आता हा दर कमी करण्यात आला आहे. काही आरोग्य व जीवन विमा योजना पूर्णपणे करमुक्त झाल्या आहेत, तर काहींवर कमी कर दर लागू होणार आहे. यामुळे सामान्य कुटुंबांना परवडणाऱ्या विमा योजना उपलब्ध होतील.
Dilipkumar Sananda : रोहणकारांचे उपोषण म्हणजे जनतेची दिशाभूल, सानंदांची टीका
या वस्तू महागणार यात, तंबाखू, बिडी, पान मसाला : कर ४०% लक्झरी कार आणि एसयूव्ही : कर ४०% पर्यंत वाढ, ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्स : कर वाढ, शीतपेये व फ्लेवर्ड वॉटर दर वाढणार पेट्रोल-डिझेल : अद्याप जीएसटीच्या कक्षेबाहेर, त्यामुळे दिलासा नाही
नव्या करप्रणालीमुळे सामान्य माणसाच्या दैनंदिन खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. मात्र चैनीच्या वस्तूंवर अधिक कर लादून सरकारने महसूल वाढवण्याबरोबरच वापरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.








