Guardian Minister Bhandara : मोठा निर्णय, भंडाऱ्याचा पालकमंत्री बदलला !

Sanjay Savkare replaced, Pankaj Bhoyar gets a chance : संजय सावकारेंची उचलबांगडी, पंकज भोयर यांना संधी

Mumbai : भाजपने एका रात्रीत मोठा निर्णय घेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. आतापर्यंत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद होते. मात्र सोमवारी उशिरा रात्री शासन आदेश जाहीर करून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडाऱ्याच्या नव्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. संजय सावकारे यांची जबाबदारी कमी करत त्यांना केवळ बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले असून हा निर्णय त्यांच्या डिमोशनप्रमाणेच मानला जात आहे.

Youth Congress : नागपुरात महानगरपालिकेसमोर भरले ‘खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन’

या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सावकारेंविषयी भंडाऱ्यात असलेल्या नाराजीमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही सावकारे फार कमी वेळा भंडाऱ्यात येत होते. केवळ राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी आणि जिल्हा नियोजन बैठकीपुरतेच त्यांचे दर्शन होत असल्याने स्थानिक पातळीवर नाराजी होती. अलीकडच्या पूरपरिस्थितीतही त्यांनी जिल्ह्याला भेट दिली नव्हती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांचा असंतोष वाढला होता.

Maratha movement : तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य !

स्थानिकांनी “आमचाच पालकमंत्री हवा” अशी मागणी वाढत होती. याशिवाय जळगावमधून येणाऱ्या सावकारेंच्या अनुपस्थितीमुळे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर जिल्ह्यात आपली पकड मजबूत करू लागले होते. त्यामुळे आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने सावकारेंना बाजूला करत वर्धा जिल्ह्यातील पंकज भोयर यांना भंडाऱ्याची जबाबदारी सोपवली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे केवळ भंडाऱ्यातच नाही तर संपूर्ण विदर्भात राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.