Gulabrao Patil : काम आहे, पण मानसिकता नाही; तरुणांना राग आला तर आला !

Elections due in four years, Minister’s sharp attack : चार वर्षांनी निवडणुका आहेत मंत्री गुलाबराव पाटील यांची परखड फटकेबाजी

Jalgaon : जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगाराबाबत आणि कामाच्या मानसिकतेवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत परखड शब्दांत मत व्यक्त केले आहे. नोकऱ्या पाहिजेत, अशी मागणी केली जाते; मात्र नोकऱ्या उपलब्ध असतानाही त्या करण्याची मानसिकता आजच्या तरुणांमध्ये दिसत नाही, अशी स्पष्ट टीका त्यांनी केली. तरुणांना राग आला तर आला, कारण आता चार वर्षांनी निवडणुका आहेत, तेव्हाचं तेव्हा बघू, असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले.

जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित उद्योजकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांना थेट सवाल केला. काम नाही असे कोण म्हणते? बिहारी माणूस इथे येऊन मेहनत करून पोट भरतो आणि आपण मात्र त्याच्यावर टीका करतो. मग प्रश्न असा आहे की, कामाची संधी असूनही आपण ती स्वीकारत का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Davos policy : टीका अयोग्य, पण अदानी- लोढांसारख्या कंपन्यांबरोबर करार हा क्रूर विनोद !

 

 

 

आपण सतत अंबानींची उदाहरणे देतो, ते असे होते, तसे होते, पण त्यांनीही शून्यापासून सुरुवात केली. मग तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हीही प्रयत्न करून बघा, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनत आणि कामाची तयारी असली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

याच कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी जळगाव एमआयडीसीच्या दर्जाबाबतचा एक किस्साही सांगितला. जळगाव एमआयडीसीला ‘डी प्लस’ दर्जा मिळावा यासाठी आपण सात वर्षे संघर्ष केला, असे ते म्हणाले. त्या काळात सर्वांनी प्रयत्न केले, मात्र तत्कालीन उद्योग मंत्री देसाई यांचे लक्ष या विषयाकडे नव्हते. ते आमच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. अखेर एका पक्ष बैठकीत मी थेट त्यांना सांगितले की, आमच्याकडे तरी पाहा, मी काही तुमच्याकडे उधारी मागायला आलो नाही, तर जिल्ह्यासाठी मागणी करतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi : जिथे भाजपला पराभव दिसतो, तिथे मतदारच गायब केले जातात

तरीही काम झाले नाही. शेवटी हा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. त्या निर्णयावर बैठकीत मोठी वादावादीही झाली, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. आमच्या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांना एमआयडीसीमध्ये दर्जा मिळाला होता, मग जळगावला का नाही? आम्ही काय दुसऱ्याची लेकरं होतो का, अशा शब्दांत आपण रोखठोक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे तरुणांची कामाबाबतची मानसिकता, रोजगाराचा प्रश्न आणि राजकीय जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या विधानांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.