व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Gulabrao Patil on Ajit Pawar : ‘दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नका’!

Gulabrao Patil on Ajit Pawar : ‘दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नका’!

Gulabrao Patil attack on Ajit Pawar; Tensions escalate within the Mahayuti : गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला; महायुतीतच वाढले खटके

Nashik : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच वाक्‌युद्ध पेटले असून राष्ट्रवादी गटाचे नेते अजित पवार यांच्या प्रचारातील विधानांवर शिंदे सेनेचे जलपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मतदान द्या आणि विकासासाठी निधी देऊ अशी भूमिका काही नेत्यांनी मांडल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून तापलेला असताना, नाशिकमधील सभेत गुलाबराव पाटलांनी अजितदादांना नाव न घेता जबरदस्त टोलेबाजी केली. “शहण्यासारखे वागावे, दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नका” अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या वक्तव्यांवर घणाघाती प्रहार करत सभेत खसखस पिकवली.

अजित पवारांनी बारामती, मराठवाडा आणि अकोला येथे मत दिलं तर भरघोस निधी देऊ, अन्यथा विकास नाही अशा सूरात प्रचार केला असल्याचा आरोप पाटलांनी केला आणि त्यावरूनच शिंदे सेना व राष्ट्रवादीमध्ये गरम वातावरण निर्माण झाले. पाटील म्हणाले की लोकांच्या डोक्यात पैसा घालून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. “मागच्या वेळेस मतदानाआधी लक्ष्मी फिरली होती, 18 तारखेपासून घराघरांत गेली होती. आता पुन्हा 1 तारखेला येणार म्हणे. बाहेर खाट टाका आणि झोपा असं सांगत आहेत. ऊठ भक्ता काय झोपलाय, असं सांगून स्वतःला प्रसन्न करणारी लक्ष्मी दाखवायची स्पर्धा लागली आहे,” अशी वादग्रस्त फटकेबाजी त्यांनी केली.

OBC Reservation : राज्यात आरक्षणाची 50% मर्यादा लागू झाल्यास ओबीसींचे राजकीय आरक्षण शून्यावर !

सभेत पाटलांनी सत्तास्थापनेनंतरच्या कामांचा पाढाही वाचला. “पाणी योजना आम्ही आणली, त्यांनी म्हणायचं आमची आहे. नगरविकास खाते आता आपल्या कडे आहे आणि त्या खात्यातच माल आहे. मतदारसंघात बौद्ध विहार आणि इतर समाजाच्या सर्व कामांसाठी आम्ही निधी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 4 वाजेपर्यंत सरकारसाठी काम करणारे नेता आहेत,” असा प्रचार पाटलांनी जोरदारपणे केला. पुढे अजित पवारांवर थेट प्रहार करत त्यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी तो भगूरला जाऊ का असा प्रश्न माझ्याकडे विचारला होता. मी सांगितले होते जा आणि पाणीपुरवठा योजनेची घोषणा करा. पण दुसऱ्याचे काम आपले असल्यासारखे सांगू नये हा सगळाच विडंबन आहे असे पाटील म्हणाले.

Department of Education : अनधिकृत शाळेविरोधात शिक्षण विभागाची कारवाई !

सभेच्या अखेरीस पाटील यांनी शिवसेनेतील नेतृत्वाचा संदर्भ देत जुन्या आठवणी जाग्या केल्या. “छोट्या छोट्या लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं. भुजबळ भाजीपाला विकायचे, नारायणराव कोंबडी विकायचे बाळासाहेबांनीच पुढे आणलं. आमचं लव्ह मॅरेज आहे, सरळ शिवसेना आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. महायुतीत एकत्र येऊन निवडणुका लढत असतानाही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होत असल्यामुळे या निवडणूक प्रचाराला आता अधिक तिखट स्वर येण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

_____

error: Content is protected !!