Three villages facing disease : अज्ञात आजारामुळे गळताहेत लाेकांचे केस
Khamgaon एखाद्या घरात अनुवांशिक समस्येमुळे अनेकांना केस गळण्याचा त्रास असतो. अशावेळी अनेक उपाय केले जातात. पण खामगावमध्ये एक-दोन लोकांना नव्हे तर तब्बल तीन गावांना केस गळण्याच्या समस्येने ग्रासले आहे. या गावांमध्ये टक्कल पडण्याचीच जणू साथ आली आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अज्ञात आजारामुळे लाेकांचे केस जात असून त्यांचे टक्कल पडत आहे. हा प्रकार शेगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये सुरू आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणांमुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबांतील सदस्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणे. असा प्रकार घडत आहे.
Experiments by farmers on raw turmeric : वायगावच्या नामांकित हळदीला प्रक्रिया उद्योगांची प्रतीक्षा
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक खाजगीत उपचार घेत आहेत. शॅम्पूने असा प्रकार घडत असावा, असे डॉक्टरांचे मत आहे. पण तरीही आयुष्यात कधी शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आराेग्य विभागाचे हाेतेय दुर्लक्ष
आतापर्यंत आरोग्य विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या तिन्ही गावांमध्ये उद्भवलेल्या समस्येबाबत उपचार शिबिर घेण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे़.
Transgender Security : तृतीयपंथियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
तीन दिवसातच पडत आहे टक्कल
कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावांमध्ये केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत आहे. तसेच तीन दिवसातच आपोआप टक्कल पडत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते यांना निवेदन दिले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही निवेदन देण्यात आले आहे. तसेच गावात उपाय याेजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
दरम्यान, या अज्ञात आजारामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या आजाराचा धसका घेतल्याचे चित्र आहे. तातडीने उपाय याेजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अचानक तीन दिवसांत टक्कल पडत असल्याने आराेग्य विभागही संभ्रमात पडला आहे








