Harshwardhan sapkal : मोदी–सावरकरांचा एआय फोटो व्हायरल

harshwardhan-sapkal-ai-photo-pm-narendra-modi-veer-savarkar-criticism : काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची पंतप्रधानांवर टीका

Mumbai : इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सपकाळ यांनी सोशल मीडियावर मोदी आणि विनायक दामोदर सावरकर यांचा एआयद्वारे तयार केलेला काल्पनिक फोटो शेअर केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला तात्पुरत्या स्वरूपात रशियाकडून खनिज तेल खरेदी करण्यास ३० दिवसांची परवानगी दिल्याची माहिती समोर आली होती. या निर्णयानंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.

Old vehicles tax : जुनी वाहने मोडीत काढून नवी घेतल्यास करसवलत

याच मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर एआयद्वारे तयार केलेला एक फोटो शेअर केला आहे. या काल्पनिक छायाचित्रात नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर ‘तडजोड करणारा’ असा बिल्ला लावलेला दाखवण्यात आला आहे, तर त्यांच्या हातात अमेरिकेच्या परवानगीचा कागद असल्याचे दर्शवण्यात आले आहे. या फोटोमध्ये सावरकर मोदींना ‘शाब्बास… तुम्ही परंपरा जपली’ असे म्हणताना दाखवले आहे. सपकाळ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण विरोधकांनी भारताला तेल खरेदीसाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागते का, असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

lpg shortage : इराण युद्धाचे भारतालाही चटके; एलपीजी तुटवड्याची शक्यता

हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वीही सावरकरांवर टीका केली होती. टिपू सुलतान वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सावरकरांनी लिहिलेल्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकाचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे लिखाण केल्याचा आरोप केला होता. शिवाजी महाराजांच्या सज्जनतेला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकरांनी केले, असा दावा करत भाजपवर गोंधळ निर्माण करण्याचे राजकारण केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला होता.