No difference between the governments of Aurangzeb and Fadnavis : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आक्रमक पवित्रा
Nagpur औरंगजेबच्या निर्दयी कारभारावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झालेला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असल्याचे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. हर्षवर्धन सपकाळ सर्वोदयी विचाराचे व मवाळ भूमिका घेणारे असे म्हटले जात होते. परंतु त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्यावर धारधार शब्दांमध्ये हल्ला केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबु असीम आझमी यांनी औरंगजेबच्या कारभाराचे कौतुक केले होते. औरंगजेबबद्दल जेवढे वाईट बोलले जाते, तेवढा तो वाईट नव्हता, असा दावा आमदार आझमी यांनी केला होता. यावरून महायुतीच्या आमदारांनी जोरदार टीका केली होती. तसेच विधानसभेत सर्व पक्षाच्या सदस्यांनी आमदार आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. संतप्त सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार आझमी यांना अधिवेशन काळासाठी निलंबित केले आहे.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार कडाडले; म्हणाले, केवळ अधिवेशन काळापूरतेच निलंबन का?
मवाळ नव्हे जहाल
या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी X या समाजमाध्यमांवर पोस्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. औरंगजेबाने जेवढे अत्याचार केले. तसेच अत्याचार धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत केलेले आहेत. औरंगजेब व देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असल्याचे सपकाळ यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Wardha District Hospital : तानाजी सावंत यांच्या काळात नागपूरच्या रुग्णालयाशी ‘आर्थिक’ करार?
हर्षवर्धन सपकाळ यांचा पिंड सर्वोदयी विचारावर तयार झालेला आहे. ते आक्रमक राहणार नाही, असे बोलले जात होते. राज्याला आक्रमक प्रदेशाध्यक्ष पाहिजे, असे काँग्रेसच्या गोटातूनही बोलल जात होते. परंतु आक्रमक म्हणणारे काँग्रेस नेते महायुतीच्या नेत्यांवर टीका करताना हातचे राखून बोलतात. परंतु हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण मवाळ नसून जहाल पंथातील असल्याचे या प्रतिक्रियेतून दाखवून दिले आहे.