₹566 crore for crop loss compensation in Western Vidarbha : पश्चिम विदर्भातील पिकनुकसानीवर मदतीची फुंकर
Amravati यंदा जून ते ऑगस्ट या काळात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. एकूण ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्यांच्या ६ लाख ५४ हजार ५९५ हेक्टर शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. या नुकसानीसाठी शासनाने २३ सप्टेंबर रोजी ५६५.६० कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे.
सततधार पाऊस, अतिवृष्टी, नदीकाठच्या शेतीत गाळ साचणे आणि शेती खरडून जाणे यामुळे मोठे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतींचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार निधी उपलब्ध झाला आहे.
Zilla Parishad Election : प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १ हजार मतदार!
अकोला जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचा प्रस्ताव अद्याप शासनापर्यंत पोहोचलेला नसल्याने, त्या भागाचा मदतनिधी स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून शासनाला पाठविल्या जातील. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यास विशिष्ट क्रमांक (व्हीके नंबर) दिला जाईल. हा क्रमांक प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक असेल. त्यानंतर ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात मदतनिधी जमा होणार आहे.
District Co-operative Bank : विरोधकांकडून जिल्हा बँकेची नैराश्यातून बदनामी
जिल्हानिहाय निधी वाटप
अमरावती जिल्हा : १,६८,८५३३ शेतकरी – १०८.७१ कोटी
अकोला जिल्हा : ११,५९७ शेतकरी – ६.२१ कोटी (जून-जुलैपुरते)
यवतमाळ जिल्हा : २,२६,६५२ शेतकरी – १८३.४२ कोटी
बुलढाणा जिल्हा : १,८०,३६८ शेतकरी – १२१.८९ कोटी
वाशिम जिल्हा : २,०१,८२४ शेतकरी – १४५.३५ कोटी








