Heavy rains cause damage : विजय वडेट्टीवारांच्या आवाहनाला चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिसाद !

Chandrashekhar Bawankule responds to Vijay Wadettiwar’s appeal : भाजपचे आमदारही देणार एक महिन्याचे वेतन

Nagpur : अतिवृष्टीने शेतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतं खरवडून गेले अशात शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी मी आपले सहा महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे. सर्वपक्षीय आमदारांनीही शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला भाजप नेते, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमचे आमदारही एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री म्हणाले, वेतन देण्यासोबतच आमचे सगळे कार्यकर्ते, आमदार, खासदार मदत करत आहेत. अमरावती आणि नागपूर येथे मी स्वतः पाहणी करणार आहे. जे काही नुकसान झाले, त्याचे पंचनामे तात्काळ केले जातील. यासंदर्भात उद्धव ठाकरेंचा सल्ला आम्ही ऐकला आहे. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत द्यायची असते. पण हेच ठाकरेंनी माध्यमांच्या माध्यमातून नव्हे तर पत्र पाठवून सांगितले पाहिजे. त्यांचे पत्र मिळाले तर त्यांच्या मागण्यांचा विचार नक्कीच करू.

Appreciation of CM : देवाभाऊ भावनिक, विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता !

खरवडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे सुरू आहेत. याचे नियम वेगळे आहे. खरवडून गेलेल्या जमिनी चांगल्या करण्यासाठी वेगळी मदत केली जाईल. आपत्ती फार मोठी आहे. नुकसान प्रचंड झाले आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आठ, १० प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे वाटप करतो, ते सारं वाटप सुरू झालेलं आहे. अनेक लोकप्रतिनिधी, एनजीओ, व्यावसायीकसुद्धा आपाआपल्या परीने शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

Heavy Rains : ..तर मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का?

१७ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे आले आहेत. आज किंवा उद्या त्याचे जीआर निघतील. शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यायची आहे. ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत द्यायची आहे शेतकऱ्यांचे पैसे वेगळे द्यायचे आहेत. जे घरं पडले त्यांना वेगळे पैसे द्यायचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.