व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Heavy Rains : ..तर मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का?

Heavy Rains : ..तर मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का?

Congress leader Vijay Wadettiwar questions Ajit Pawar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा अजित पवार यांना सवाल

Nagpur : विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडाला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके वाहून गेली. अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पूर्ण झालेली नाही आणि अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांवरच भडकतात. ‘पैशांचे सोंग आणता येत नाही..’, असे ते म्हणाले आहेत. तिजोरीची अवस्था ठीक नाही म्हणून काय सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना केला.

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत. पण हा केवळ देखावा आहे. किती मदत देणार, हे मुखमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारले तर ते म्हणतात, ‘राजकारण करू नका’ शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला तर यामध्ये कुठे आले राजकारण, असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी केला. सरकार जर बांधावर गेलं आहे, तर जनतेला ठोस आश्वासन का देत नाही. मदत किती देणार, हे सांगत का नाही. याचा अर्थ सरकारची मदत करण्याची नियत नाही. सरकार केवळ बनवाबनवी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Parliamentary Debate : संवाद नाही, संसदीय चर्चेच्या अभावावर खंत !

अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीची मागणी केल्यावर ते भडकतात कशाला. मागील वर्षी निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा याच पक्षांनी केली होती. अन् आता कारणे का देत आहेत. लाडक्या बहीणींचे कारण सरकार देत आहे. ही योजना पण मते मिळवण्यासाठी होती. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. सोयाबीनवर कीड आली आहे, शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळण्याचीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

Vidarbha Farmers : आठ महिन्यांत १४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

 

मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पिकच गेेले नाही, तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी मी सहा महिन्यांचे आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. सर्वपक्षीय आमदारांनीही आपले वेतन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

error: Content is protected !!