Help for farmers : ३३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ३,२५८ कोटी

Government has provided assistance of Rs 7,500 crore so far : सरकारकडून आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत वितरित

Mumbai: राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित २३ जिल्ह्यांतील तब्बल ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार हेक्टरपेक्षा अधिक बाधित क्षेत्रासाठी ३,२५८ कोटी ५६ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण साडेसात हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी १,३५६ कोटी रुपयांची मदत कालच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

MLAs defender case : गाजलेल्या ‘डिफेंडर’ प्रकरणात अखेर खरा मालक समोर

एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेती तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्या दोन्ही महिन्यांची एकत्रित भरपाई मंजूर केली आहे. मात्र, लाभार्थी शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी असल्याने त्यांना अद्याप पात्र ठरविण्यात आलेले नाही. मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Voter list allegations : सदोष मतदारयादीचा आरोप फेटाळला !

पुणे जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यातील अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ४७ हजार ४२४ मंजूर लाभार्थ्यांपैकी ३० हजार ८९ शेतकऱ्यांनी अद्याप ‘ई-केवायसी’ केली नसल्याने त्यांना मदत जमा करता आलेली नाही. जिल्हा प्रशासनाने अशा शेतकऱ्यांना तत्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. पुणे जिल्ह्यासाठी एकूण २६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, विविध विभागांमध्ये वितरित करण्यात आलेल्या निधीचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत

नागपूर विभाग: ३,७६,९६८ शेतकरी, ३,४४,६२९ हेक्टर क्षेत्र, ३४०.९ कोटी रुपये. अमरावती विभाग: ४,७८,९०९ शेतकरी, ५,२६,३८१ हेक्टर क्षेत्र, ४६३.८ कोटी रुपये. पुणे विभाग: ८,२५,१८९ शेतकरी, ७,०९,२०९ हेक्टर क्षेत्र, ९५१.६ कोटी रुपये. नाशिक विभाग: १५,७९,२३९ शेतकरी, ११,५०,३०१ हेक्टर क्षेत्र, १४७४.८ कोटी रुपये. कोकण विभाग: १,०५,२३९ शेतकरी, २९,२३३ हेक्टर क्षेत्र, २८.१ कोटी रुपये

Local Body Elections : निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा लागणार कस!

मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. कुठलाही अडथळा येऊ न देता पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.” या आर्थिक पॅकेजमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, खरीप हंगामानंतरच्या आर्थिक तणावातून सावरण्यास ही मदत मोठी हातभार ठरणार आहे.

_____