Pushpendra-kulsreshtha-controversial-statement-on-mahatma-gandhi-congress-protest : हिंदू संमेलातील पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या विधानाने वाद
Nagpur ‘हिंदू कल और आज’ या विषयावर घेण्यात आलेल्या हिंदू समाज संमेलनातील व्याख्यानातील एका वक्तव्याने वादाची ठिणगी पडली आहे. या विरोधात काँग्रेसमधून संताप व्यक्त केला जात असून आज नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे दिली तसेच संबंधित वक्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सिव्हिल लाईन येथील चिटणीस सेंटरमध्ये सकल हिंदू समाज संमेलन या संघटनेच्या मार्फत ‘हिंदू कल और आज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ता म्हणून पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी एक वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, ‘भारताचे राष्ट्रपिता हे या देशाचे महात्मा होऊच शकत नाही.’
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांचा दणका बसताच अधिकारी निलंबित
कुलश्रेष्ठ यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खोते, बिनबुडाचे तसेच लोकांना भ्रमित करणारे व्यक्तव्य केले आहे. ते संताप आणणारे आहे. राष्ट्रपिता गांधी यांना ही पदवी लोकांनी दिली आहे. स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि शस्त्राविना क्रांती करून त्यांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले. यासाठी कोट्यवधी लोकांची त्यांना साथ लाभली. त्यांनी गांधी यांना महात्मा ही पदवी प्रदान केली आहे. हा सर्व इतिहास नमूद आहे. ब्रिटिशांनीही त्यांचे नेतृत्व मान्य केले होते. मात्र काही लोक गांधी यांचा द्वेष करतात. त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, या शब्दात संताप व्यक्त करण्यात आला.
Rajyasabha Elections : भाजप विदर्भातून राज्यसभेवर कोणाला पाठवणार? राणा, नेते यांच्या नावाची चर्चा
या विरोधात काँग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे अमर रहे असा घोष करण्यात आल्या.
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मुळक आदी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे आंदोलनात सहभागी झाले होते.








