Home Ministry : वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहार; गृह विभाग Action Mode वर!

Fraud in financial institutions; case filed in MPID Act : एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल; ठेवीदारांची पायपीट

Yavatmal जिल्ह्यात पतसंस्थांसह बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला. बहुतांश प्रकरणात एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, अनेक वर्षे लोटूनही खातेदार, ठेवीदार न्यायासाठी प्रशासन दरबारी पायपीट करीत आहे. आता गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी एमपीआयडी प्रकरणात गृह विभागाला पत्र दिले. त्यानंतर वित्तीय संस्थांमधील अपहार प्रकरणी गृह विभाग अॅक्शन मोडवर आला आहे.

यवतमाळातील बाबाजी दाते महिला अर्बन बँक, दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी, पुसदची संत सेवालाल नागरी सहकारी पतसंस्था, उमरखेड तालुक्यातील राजस्थानी मल्टिस्टेट, वणीतील वेकोलिची पतसंस्था अपहारामुळे डंक्यावर आहे. यापूर्वी यवतमाळच्या संत गाडगेबाबा नागरी पतसंस्थेत चार कोटी २४ लाख ८१ हजार ८११, आर्णीची भगवंत बिगरशेती सहकारी पतसंस्था तीन कोटी सहा लाख ८४ हजार ६०५, ढोकेश्वर को-ऑप. सोसायटी लासलगावने ९५ लाख ६२ हजार आणि ९८ लाख १९ हजारांनी ग्राहकांची फसवणूक केली.

Hanuman Jayanti : जामखारीचे सिद्ध हनुमान मंदिर : शंभर वर्षांची आस्था!

हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट तीन कोटी २५ लाख ४७हजार २५७, राळेगावच्या महिला ग्रामीण पतसंस्थेतील अपहार एक कोटी ६७लाख ९७ हजार १४६ रुपयांचा आहे. भोपाळ येथील एनआयसीएल इंडिया व निर्मल कॉर्पोरेट लि. ने एक कोटी ५५ लाख ६७ हजार ६३६ रुपयांनी गंडा घातला. जी लाइफ व ग्रीन विहार इंडिया डेव्हल्पर्सने ४८ लाख ४२ हजार ८२५ रुपयांनी नागरिकांची फसवणूक केली आहे.

आर्यरूप टुरिझम अॅण्ड रिसोर्ट प्रा. लि. ने ४४ लाख ५४ हजार ५०० आणि हिराचंद रायसोनी मल्टिस्टेटने तीन कोटी २५ लाख ४७ हजार २५७ रुपयांनी खातेदारांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. मैत्रेयने एक लाख २२ हजार खातेदारांना तब्बल ८० कोटी रुपयांनी गंडा घातला. मैत्रेयच्या अपहाराची व्याप्ती राज्यभरात आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणात समिती गठित केली.

Sanjay Puram : आमदारांच्या घरापुढे पेटवली मशाल!

मात्र, खातेदारांना न्याय मिळाला नाही. पुसदच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी पतसंस्थेत दोन कोटींचा तर समृद्ध जीवनचा अपहार अंदाजे दोन कोटींवर आहे. याची मात्र गृह विभागाकडे नोंदच नाही.