Hunger strike : विदर्भ महसूल संघटनेचं उपोषण २३ दिवसांपासून !

Vijay Wadettiwar criticizes the government while supporting the protest : आंदोलनाला पाठिंबा देत विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

Nagpur : चतुर्थ श्रेणीचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीसाठी विदर्भ महसूल संघटनेचं आमरण उपोषण आज २३व्या दिवशीही सुरूच आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला.

या भेटीदरम्यान वडेट्टीवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आजच्या महागाईच्या काळात महसूल सेवक तुटपुंज्या वेतनावर जगत आहेत. आपत्कालीन परिस्थिती असो वा लोकसेवेची जबाबदारी — दिवस-रात्र जनतेसाठी तत्पर राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना शासनाने न्याय द्यायलाच हवा.”

TET Exam : टीईटी अनिवार्यतेविरोधात शिक्षक संघाचा एल्गार!

राज्य सरकारवर टीका करताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, “श्रीमंतांच्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध होतात, पण महसूल कर्मचाऱ्यांसाठी मात्र संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे.”

विशेष म्हणजे, महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री हे दोघेही या जिल्ह्यातील असतानाही उपोषणाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आपल्या घराच्या दारात उपोषण सुरू असतानाही या कर्मचाऱ्यांच्या वेदनेकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं आहे,” अशी टीका करण्यात आली.

New railway line : वर्धा-भुसावळ आणि गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्गांना केंद्राची मंजुरी!

यावेळी त्यांनी आश्वासन दिलं की, “मी शासनस्तरावर लवकरच बैठक आयोजित करून महसूल कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन. दरम्यान, महसूल सेवकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा बहाल केला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शासन आणि महसूल कर्मचाऱ्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.