illegal money lending : अकोल्यात अवैध सावकारीवर मोठी कारवाई; १६ ठिकाणी एकाचवेळी धाड

Major crackdown on illegal money lending in Akola; simultaneous raids conducted at 16 locations : आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त, सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांची मोहीम

Akola जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी संयुक्त कारवाई करत १६ ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांनी ही मोहीम राबवून सावकारीच्या जाळ्यावर मोठा आघात केला आहे.

प्राप्त तक्रारींच्या आधारे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यासाठी सहकार विभागातील सुमारे ९० अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस विभागातील ४५ जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

धाडीदरम्यान सावकारांकडून इसार पावत्या, कोरे चेक, कोरे बॉण्ड, करारनामे, गहाणखत, खरेदीखतांच्या प्रती, सातबारा उतारे, डायऱ्या, खाता वह्या तसेच रोकड असा आक्षेपार्ह साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कागदपत्रांवरून जिल्ह्यात सावकारीचे जाळे खोलवर रुजल्याचे संकेत मिळत आहेत.

Bacchu kadu with Ashok kharat : अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वाद; बच्चू कडूंच्या व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ

जप्त कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गैरअर्जदारांची नावे गुप्तच
या कारवाईत संबंधित गैरअर्जदारांची नावे जाहीर करण्यास सहकार विभागाने नकार दिला आहे. यापूर्वीच्या काही धाडसत्रांत नावे उघड करण्यात आली होती; मात्र २०२४ आणि २०२६ मधील कारवायांमध्ये नावे जाहीर न केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
सावकारग्रस्तांना पुढे येण्याचे आवाहन
सावकारांच्या जाचाला कंटाळलेल्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाहीही प्रशासनाने दिली.

Maharashtra Congress : काँग्रेसचे ‘मिशन ग्राऊंड झिरो’; संघटनेत मोठा फेरबदल होणार!

ही मोहीम जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अकोला व वाशिम जिल्ह्यातील सहकार व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांनी कारवाई पार पाडली.
दरम्यान, आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.