Former MP criticizes that democracy is under threat due to the ruling party : माजी खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा; आमदार गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा
Buldhana राज्यात लोकप्रतिनिधींनीच कायद्याचा उल्लंघन सुरू केल्याची टीका एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. “जिथे कायदे बनवले जातात, तिथेच ते पायदळी तुडवले जात आहेत. अशावेळी सामान्य नागरिकांच्या अपेक्षांचा चुराडा होतो. लोकांनी विश्वासाने सत्तेवर बसवलेल्यांना भविष्यात घरी बसवावे लागेल,” असा इशारा एआयएमआयएम (AIMIM)चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
बुलढाणा शहरात एआयएमआयएम (AIMIM) पार्टीच्या वतीने आयोजित भव्य सत्कार आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, तर अनेक नवयुवक आणि नागरिकांनी पक्षप्रवेश करून एआयएमआयएमला बळ दिले.
Mahayuti Government : मोरखेडमधील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा!
“लोकप्रतिनिधींकडून होणारी गुंडगिरी आता जनता सहन करणार नाही. जिथे अन्याय होईल, तिथे आम्ही ठामपणे उभे राहू,” असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही टीका केली. “कॅन्टीन मॅनेजर मारहाण प्रकरणानंतर मी केलेल्या टीकेनंतर आमदार संजय गायकवाड यांनी ‘इतना मारुंगा’ असे वक्तव्य केले. त्याचे आव्हान मी स्वीकारले असून, बुलढाण्यात येऊन त्याला प्रत्युत्तर प्रतिउत्तर दिले,” असे जलील यांनी स्पष्ट केले.
Chandrashekhar Bawankule : बायोमेट्रिक अथवा फेस अटेंडन्सशिवाय पगार नाही
‘सत्ताधारी पक्षांचे धोरण हे सामान्य जनतेला दूर लोटणारे आहे. संविधानाचे मूल्य आणि लोकशाही प्रक्रिया धोक्यात येत आहेत,’ अशी टीका जलील यांनी केली. अशा परिस्थितीत एआयएमआयएम हा पर्यायी आवाज ठरू शकतो, असा दावाही त्यांनी केली. “सामाजिक समतेसह संविधानिक मूल्यांचे संरक्षण हेच एआयएमआयएम पक्षाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आता एकजुटीने आवाज उठवण्याची गरज आहे,” असेही ते म्हणाले.