Sanjay Raut makes serious allegations against the government : संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
Mumbai : काल झालेल्या भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट सामना फिक्सिंगचा आरोप करत केंद्र सरकारवर टीका केली. “हा सामना खेळू नये, अशी मागणी होती. पण सरकारच्या दबावाखाली संघाला खेळावं लागलं,” असा दावा त्यांनी केला.
राऊत म्हणाले की, “भारताने पाकिस्तानला दारुण पराभूत केलं असलं, तरी या सामन्यामागे काळा पैसा फिरला आहे. तब्बल २५ हजार कोटी रुपये पाकिस्तानमध्ये गेले आहेत. हा पैसा भारताच्या विरोधात वापरणार आहेत. पैशासाठी तुम्ही एका सामन्यावर बंदी घालू शकत नाहीत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Statement of former CM : खोट्या आरोपांनी वनवास, भाजपने दिला सन्मान !
यावेळी त्यांनी सामना फिक्सिंगचाच असल्याचं ठामपणे सांगितलं. “ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यालाच या सामन्यातून पैसा कमावून दिला. कालच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. संघाची इच्छा नसताना हा सामना खेळवला गेला. सुनील गावस्कर यांनीही यावर भाष्य केलं,” असं राऊतांनी नमूद केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी हल्लाबोल केला. “शिंदे यांनी आधी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरणं बंद करावं. पाकिस्तानशी हस्तांदोलन झालं नाही, असं सांगितलं जातं. पण सामना खेळलात ना? मग फरक काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
India Vs Pakistan cricket match : ‘माझं कुंकू, माझा देश’, सरकारचा निषेध!
भारत – पाक सामन्याला राज्यभरातून विरोध झाला. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महिन्यांतच सामना खेळणे ही चुकीची भूमिका असल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलं.
_____








